जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून नांदेडच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसला वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवानेच चालवावी असे वाटत होते त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणारी याकडे सर्वांचे लक्ष आहे.