लोकसभा उमेदवार रवींद्र चव्हाण यांची नवनीत सिंह गांधी यांच्या घरी सदिच्छा भेट.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड -इंडिया आघाडीचे नांदेड लोकसभा मतदार संघांचे उमेदवार श्री.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्प संख्यांक विभागाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नवनीत सिंह गांधी यांच्या अबचल नगर येथील निवासस्थानी भेट दिली.

      रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत.या भेटीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा तसेच नांदेड लोकसभा पोट निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे लवकरच पोट निवडणूक होणार असून रवींद्र चव्हाण हेच पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून जवळपास मान्यता मिळाली आहे.

    चव्हाण कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीस हिरवा कंधील दाखविला असून त्यांनी संपूर्ण मतदार संघात भेटी गाठी घेण्यास सुरवात केली आहे.नवनीत सिंह गांधी हे नांदेड आणि पुणे येथील रहिवासी असून त्यांचा व्यवसाय पुणे येथे आहे.त्यांचे सलोख्याचे संबंध थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आहेत.

रवींद्र चव्हाण यांच्या भेटीदरम्यान सरबजीत सिंग बटर (उपाध्यक्ष,युवक काँग्रेस मुंबई), सरजीत सिंग ढिल्लों (सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग), अरेफ खान (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग) आणि डॉ. अब्दुल बाक़ी (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग) आदींची उपस्थिती होती.श्री.रवींद्र चव्हाण यांची ही भेट आणि सखोल चर्चा आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरिता आणि लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहोत अशी संकल्पना उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली आहे.अशी माहिती नवनीत सिंह गांधीसरचिटणीस,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभाग कमिटी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!