उमरी प्रतिनिधी व/उध्दव मामडे
उमरी – तालुक्यांतील मोखडी या गावातिल सरपंच उत्तम पिरसिंग जाधव /रोहीदास राठोड यांची तालुका स्तरीय संतसेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृद्धी योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदि नुक्तिच निवड करण्यात आली असल्याचे पत्र त्याना प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.तासुयो-२०२४/प्र.क्र.४४(तालुकास्तर-२)/आस्था-५बांधकाम भवन मुंबई दिनांक १४ऑक्टोंबर २०२४नुसार संतसेवालाल महाराज बंजारा/लमान तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी बाबत बंजारा/लमातांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्याला महसुली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, सदर योजनेंतर्गत करावयाच्या कामांचा ग्रामपंचायतीकडुन प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समिती मध्ये बंजारा/लमाण समाजाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदरील निवड तिनं वर्षासाठी राहणार असलेल्या उमरी तालुक्यातुन उत्तम पिरसिंग जाधव व रोहीदास राठोड हुंडा तांडा यांची निवड करण्यात आली आहे.गेल्या तिनं दशकांपासून राजकीय क्षेत्रातील काम करत असताना उत्तम जाधव हे सेवा सहकारी संस्था, तालुका दक्षता समिती, गावातील सरपंच म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन उत्तम जाधव व रोहीदास राठोड यांचे निवड झाली आहे.या निवडीचे तालुक्यासह मोखंडी,व हुंडा तांडा येथील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.