विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – दि.१८ऑक्टोबर ८३-किनवट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार असून,
कोट्यवधीचा निधी त्यांनी मिळवत आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला असून, मागासलेला भाग ही जुनी ओळख पुसून काढत आज किनवट व माहूर तालुक्याचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला आहे.२०१९ तो ट्रेलर था,२०२४ की पिक्चर अभी बाकी हैं! असे ललकारी मारत केराम यांनी निवडणूकीसाठी कंबर कसली आहे.अर्थातच २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव असून,निसंकोच तिकीट त्यांनाच मिळणार हे पक्के असतानाही भाजपतर्फे पावसाळी बेडकाप्रमाणे ऐनवेळी निवडणूक मौसमात उगवत ड्र्यांवड्रयांव करत जवळपास दीड डझन इच्छुकांनी उड्या मारणे सुरू केले आहे. परंतु, जी पूर्वी १५ वर्षात मिळून केली गेलेली नाहीत त्यापेक्षाही कैकपटीने अधिक आणि वेगाने विकास कामे गत अडीच वर्षांच्या काळात झाली आहेत.”आणि म्हणून, फिर एकबार आमदार भीमराव केराम!” असा बुलंद आवाज या मतदारसंघातील जनता जनार्दनातून ऐकावयास मिळत आहे.
८३-किनवट विधानसभा
मतदारसंघात निवडणूक लढविण्यास भाजपकडून इच्छुक असलेल्यात अशोक पाटील सूर्यवंशी,सुधाकर भोयर,इंजिनिअर प्रकाश टारपे,किशन मिराशे,
संध्याताई प्रफुल्ल राठोड,
धरमसिंग राठोड,ॲड.
अविनाश राठोड,सचिन नाईक,
शरद राठोड,अशोक नेमानीवार
गोवर्धन मुंडे,डॉ.उत्तम धुमाळे.
भारत हातमोडे,भगवान हुरदुके,जितेंद्र कुलसंगे,गोकुळा पळसपुरे इत्यादी जवळपास दिड डझन संख्येने इच्छुकांना गुडघ्याला बाशिंग बांधून आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत.
लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासीसोबतच बहुसंख्य असलेल्या बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतदानावर तीन पंचवार्षिक निवडणूक जिंकलेल्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव करून शिवसंग्राम पक्षाचे (भाजपा समर्थीत) भीमराव केराम यांनी राजकीय इतिहास रचण्याचा भीम पराक्रम केला.आणि यानंतर राजकीय उलथापालथ घडून आली.स्पष्ट बहुमत मिळवूनही भाजपा शिवसेना युतीची सरकार न बनता शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविआ कडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.पाच वर्षातील ठाकरे सरकारची अडीच वर्षे सोडली तर नंतर पून्हा एकदा राजकीय उलथापालथ होऊन भाजपा,शिवसेना ( शिंदे),
महायुतीकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. झालेले सत्तांतर आ. केराम यांच्या पथ्यावर पडले आणि खऱ्या अर्थाने जेमतेम अडीच वर्षाचाच कालावधी आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आ. केराम यांना मिळाला.आणि कोट्यवधी रुपये विकास निधींच्या कामांची विकास गंगा त्यांनी आपल्या मतदारसंघात वळवली.न भुतो,… अशी विकास कामें त्यांच्या कार्यकाळात झाली आणि म्हणूनच फिर एकबार आमदार केराम अशी जोरदार चर्चा या मतदारसंघातील जनतेतून ऐकावयास मिळत असून,केराम यांची दावेदारी भक्कम असल्याने त्यांनाच किनवट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली.आचारसंहीतेच्यारुपाने निवडणूकीच्या मैदानावर लक्ष्मणरेषा आखूण देण्यात आली.तरी पण आजपर्यंतही कोणत्याही राजकीय पक्षाकडून आपल्या (संभाव्य वगळता) निश्चित उमेदवाराच्या नावाची फायनल यादी जाहीर करण्यात आली नसल्याने, आपल्या मतदारसंघातील आमदारकीचा कोणत्या पक्षाकडून,महायुतीकडून,
महाविआकडून अथवा तिसऱ्या आघाडीकडून कोणता अमुक उमेदवार निवडणूक लढविणार आहे याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.यावेळी सर्वच राजकीय पक्ष भूतकाळातील निवडणूकीच्या अनुभवावरून धडा घेऊन उमेदवारी जाहीर करण्यासाठी अगदी ‘फुंकफुंककर कदम रख रही हैं’ असे दिसून येत आहे.पाच वर्षाच्या परफॉर्मन्सच्या
आधारावर उमेदवारी निश्चित करण्यात येत असून, खराब परफॉर्मन्स देणाऱ्या अनेक विद्यमान आमदारांचे टिकिट कापण्याचा कठोर निर्णय सुद्धा पक्षाकडून घेतला जातो आहे.
असे असले तरी, किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव केराम यांचीमहायुतीच्या भाजपतर्फे उमेदवारी निश्चित समजण्यात येत आहे. कोट्यवधींची विकास कामे मतदारसंघात खेचून आणत विकास साधल्याने विरोधकांचे नक्कीच धाबे दणाणले असून, विरोधात नॅरेटीव प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असल्याचे प्रतिक्रियारुपी चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.पदाशिवाय (आमदार) ओळख नाही,पैशाशिवाय (निधी) विकास होत नाही,
आणि म्हणून सत्तेशिवाय शहाणपण नाही.म्हणजेच राजकारणात सत्ता साखळी असली तर विकास भरभरून होतो “आणि म्हणून पाहिजे पुन्हा एकदा भीमराव रामजी केराम” असे म्हणत असल्याचे जनतेतून ऐकावयास मिळत आहे.