मुंबई – लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या सर्वपक्षीय माजी खासदारांना विधानसभेचे वेध लागले आहेत. आमदारकी मिळविण्यासाठी या माजी खासदारांचा खटाटोप सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या सर्वपक्षीय माजी खासदारांना विधानसभेचे वेध लागले आहेत. आमदारकी मिळविण्यासाठी या माजी खासदारांचा खटाटोप सुरू आहे.
लोकसभेत पराभूत झाल्याने काही जणांना विधानसभेवर निवडून येण्याची घाई झाली आहे. बीड मतदारसंघातून लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदवर निवड करून भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. अन्य पराभूतांनाही आपले राजकीय पुनर्वसन व्हावे, अशी इच्छा आहे.