केराम दुसऱ्यांदा निवडून आल्यास मंत्री पदाची शक्यता – महेंद्र वैष्णव
छत्तीसगड येथील भाजपाचे प्रवासी प्रचारक महेंद्र वैष्णव यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड – महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आज रविवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या ९९ उमेदवारांची प्रथम यादी जाहीर करण्यात आली.त्यात किनवट/ माहूर विधानसभेसाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपाच्या वतीने विद्यमान आ.भीमराव केराम यांना अपेक्षेप्रमाणे दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. भाजपाच्या राष्ट्रीय संघटनेकडून छत्तीसगड येथून प्रवासी प्रचारक म्हणून जबाबदारीवर आज माहूर येथे आलेले महेंद्र वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर भाजपातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
“राज्यात जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार निवडून आणून बहुमताने. सरकार स्थापन करण्यासाठी किननवट विधानसभा निवडणुकीत आ.केराम यांना दुसऱ्यांदा विजयी केल्यास त्यांना या आदिवासी बहुल मतदारसंघातून आदिवासी विकास मंत्री किंवा एखाद्या इतर खात्याचे मंत्री बनण्याची सुवर्ण संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकेल!”असे विश्वासपूर्ण सूचक वक्तव्य वैष्णव यांनी यावेळी बोलताना केले.
मतदारसंघात डझनावर इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.किनवट माहुर मतदारसंघात पक्षातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात किनवट माहुर मतदारसंघातील मतदारांनी आमदार भीमराव केराम यांना प्रथम पसंती दिली, तसेच त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल घेऊन त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.त्याबदल् माहुर भाजपातर्फे तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर यांच्या नेतृत्वात तर छत्तीसगड येथील किनवट माहुर विधानसभा प्रवासी प्रचारक महेंद्र वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. केराम यांच्या उमेदवारीने मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले असून,अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा नेते अनिल वाघमारे, नगरसेवक गोपु महामुने,जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, ज्योतीराम राठोड, निळकंठ मस्के, महीला शहराध्यक्षा निर्मला जोशी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष जीवन अग्रवाल,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे,नंदु कोलपवार, पत्रकार बजरंगसिंह हजारी,अनुदीप कोरटकर,संत सेवालाल तांडा वस्ती सूधार योजनेचे सदस्य मनिष राठोड, कैलास फड, रामकृष्ण केंद्रे , शामराव कुमरे, अशोक जोशी, मनोज पुरी,निलेश तायडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.