नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
नांदेड – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅं.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर येथे तालूका युवासेना संघटनेची मजबुत बांधणी करण्यासाठी माहूर तालूका संवाद दौरा काल दिनांक १९/१०/२०२४ रोजी
शिवसेना उपनेते तथा विधानपरिषद सदस्य,अध्यक्ष (मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य)मा.स्व.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र.
नामदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी माहूर येथील युवा कार्यकर्ते युवकांचे आशास्थान पत्रकार विजयसिंह बजरंगसिंह हजारी यांनी शिवसेना उपनेते तथा विधानपरिषद सदस्य ना.हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवसेना (एशिं) पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी विजयराणा यांची शिवसेनेचे माहूर युवासेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीचे ना.हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्रमंडळींनी अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला संवाद मेळावा मुसळधार पावसामुळे झालेल्या बत्तीगुल नंतरही झंझावाती जोशाने उशीरापर्यंत सुरू होता. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हाडसणीकर,महीला आघाडी जिल्हा प्रमुख शितलताई भांगे पाटील,
सचिन किसवे,डाॅ.नाईक,शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,
शिवसेना शहर प्रमुख किनवट सुरज सातुरवार,जेष्ठ शिवसैनिक मनोज आन्ना तिरमनवार,शिवसेना शहर प्रमुख माहूर विकास कपाटे,शिवसेना महीला आघाडी विधानसभा संघटक भारतीताई पवार,शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमुख ज्योतीताई टिपकर,शिवसेना विधानसभा संघटक हिरासिंग चव्हाण,शिवसेना विधानसभा संघटक संतोष दुबे,
शिवसेना तालूका समनवयक संजय जोशी,शिवसेना तालूका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील,शिवसेना उपशहर प्रमुख पवण शर्मा,जेष्ठ शिवसैनिक विलास टिपकर,अरविंद जयस्वाल,ऑटो युनियन कैलास जाधव,शिवसेना सोशल मिडीया प्रमुख सदानंद पुरी,युवासेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गुजल्लवाड,युवासेना तालूका प्रमुख सोनु चौधरी,युवासेना उपतालूका प्रमुख समाधान जाधव,युवासेना उपतालूका प्रमुख आदर्श आडे, युवासेना तालूका संघटक लखन राठोड,युवासेना शहर प्रमुख विजयराना हजारी,युवासेना उपशहर प्रमुख यांच्या सह शिवसेनेचे युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसेना युवासेना सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख,सर्कल प्रमुख,विभाग प्रमुख,व सर्व शिवसेना युवासेना कार्यकरते मोठ्या संखेने उपस्थित होते.