हिमायतनगर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर : तालुक्यातील भक्तांना पावन होत असलेल्या तीर्थक्षेत्र बोरगडी येथे अधिक मासानिमित्त तबळ एक महिना हनुमान मंदिरात राम नावाचा जप सातत्यपूर्ण चालू केल्याने गावामध्ये भक्तीमय वातावरण झाल्याची दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारे मंदिर बोरगडी देवाची येथे भक्ताला पवणारे मारुतीरायाच्या मंदिरात महान तपस्वी परमपूज्य गुरुवर्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज शिव सद्गुरू शिवलिंग महाराज स्वामी महाराज दत्त संस्थान मठ पिंपळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र बोरगडी देवाची येथे अधिक मासानिमित्त एक महिना श्रीराम नामाचा जप करीत भक्तांनी घेतला आनंद. भक्ताला पावन असणारे श्री बजरंग बली बोरगडी मंदिरात दिनांक 20 पासून सुरू असलेल्या रामनामाचा यज्ञ सोहळा भक्तांच्या गर्दीने भरून गेला बोरघडी येथे भक्तांचा मेळा जमत जय राम श्रीराम जय जय राम नामाच्या गजरात बोरघडी नगरी भक्तीमय झाल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

सदर राम नामाचा जप करीत गावातील भाविकांनी जीवनाचे स्वार्थ करून घेतल्याचे दिसून येत आहे श्रीराम नामांचे महत्त्व भाविकाला सांगत गुरुवर्य महाराजांनी भक्तांना राम नामाच्या जयघोषात मंत्रमुग्ध केल्याचे दिसून येत आहे विशेषता या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये गावातील महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून येत आहे या राम नामाच्या सोहळ्याच्या निमित्ताने महिलांनी मंदिरात जाऊन राम नामाच्या जपात मलीन झाल्याचे दिसून येत आहे एकंदरीत बोरगडी गावातील वातावरण हे भक्तिमय झाल्याचे दिसून आल्याने या भागात बोरगडी ही भक्तांची नगरी असल्याचे चर्चा होताना दिसून येत आहे. श्री हनुमंत राया हे भक्ताला पावणारा असल्याने सुप्रसिद्ध नगरी ही बोरगडी असून या बोरगडी नगरीमध्ये गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये राम नामाचा जप अधिक मासानिमित्त चालू झालेला आहे. म्हणून गावातील भाविक भक्तांनी राम नामात तलीन झाल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले आहे.