मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी मुदखेड तालुक्यात प्रथम…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2’ अंतर्गत मुदखेड तालुक्यातील 86 जिल्हा परिषद शाळेचे 150 गुणांचे मूल्यांकन पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या मुख्य व इतर अनेक उपमुद्द्यांच्या आधारे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून करण्यात आले. त्यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रंगरंगोटी,बोलक्या भिंती, निवडणूक व साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार,पर्यावरण विषयक जागृती,बाल सुरक्षा , तक्रार निवारण यंत्रणा, क्रीडांगण व क्रीडा सुविधा, परसबाग,आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा,ग्रंथालय, स्वच्छता विषयक स्थिती ,कचरा पुनर्वापर,प्लास्टिक मुक्त वातावरण,प्रयोगशाळा ,इंटरनेट सुविधा,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध योजनांबाबत जनजागृती, मेरा देश मेरी माटी , तंबाखूमुक्त शाळा अभियान, स्काऊट गाईड,शाळा विकास आराखडा ,सुसज्ज इमारत व उत्कृष्ट गुणवत्ता या सर्व बाबी निकषापेक्षाही उत्कृष्ट असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी या शाळेने सर्वाधिक गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून तीन लाख रुपयाचे बक्षीस मिळविले आहे तर दोन लाख रुपयाचे द्वितीय पारितोषिक जि प प्रा शा सीता बोरगाव या शाळेने व एक लाख रुपयाचे तृतीय पारितोषिक जि प प्रा शा कामळज वस्ती या शाळेने पटकावले आहे.

 

या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक चंद्रकांत घोडगे, यशवंत महाजन,महम्मद नूर शेख व विष्णुकांत शिंदे या सर्व शिक्षकांचे पं स मुदखेड चे गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील,गोविंद कल्याणकर,केंद्रप्रमुख लक्ष्मण मगरे,शिवाजी पाटील, संतोष सुजलेगावकर,सूर्यकांत गच्चे, जाधव सर,माधव अंभोरे,गंगाधर कोकरे,अनिल दुधमल,श्याम दादजवार, पोलीस पाटील गंगाधर कोलते,कौशल्या मुंडे, उषा बनसोडे,संगीता पाचकवडे, पद्मावती कळकेकर,पत्रकार राहूल कोलते,गोविंद गाढे, आनंद गाढे,पंढरी गाढे,लालजी गाढे,सुरेखा गाढे, शेशाबाई गाढे यांच्यासह गावकरी तसेच तालुक्यातील शिक्षण प्रेमी जनतेने भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!