जमीनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी! दोन्ही गटातील लोक जखमी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्यात प्रॉपर्टीच्या वादातून बुधवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. सदरील तुंबळ हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील जन्मभूमी ते कर्मभूमी या राज्य मार्गावर महावीर चौका समोर येताळा रोडवर पांडे कुटुंबीयांची जमीन आहे.पण सदरील परीसरातील ६६ गुंठे जमीन नरहरी लक्ष्मणराव चव्हाण व विनोद देवराव बोईनवाड यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे.सदरील जमीनीचे नियमानुसार कोर्ट मोजणी करून सर्वे नंबर १४७/ ३मधील ६६ गुंठे जमीनीचा ताबा घेतला आहे.तेव्हा पासून अंदाजित ८ते १० महिन्यांपासून सदरील जमीनीचा वाद पेटला होता.व सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. 

अशी चर्चा आहे.सदरील वाद मिटविण्यासाठी शहरातील अनेकांनी प्रयत्न केले आहेत. परंतु सदरील परीसरात पांडे कुटुंबीयांची शेत जमीन मोठ्या प्रमाणावर असून त्या शेतजमीनीवर पांडे कूटूबिंयाचा ताबा आहे.परंत पांडे कुटुंबाच्या नावावर असलेल्या सातबारा पेक्षा अधिक जमीनीवर पांडे यांचा ताबा असल्याचा दावा नरहरी लक्ष्मणराव चव्हाण व विनोद देवराव बोईनवाड यांनी केला आहे.सदरील शेत जमीन नियमानुसार मोजणी करण्यासाठी पांडे कुटुंबाना सांगण्यात आले होते. परंतु जमीन मोजणी करण्यासाठी पांडे कुटुंब टाळाटाळ करीत असल्यामुळे पांडे कुटुंबांवर संशयाची सुई निर्माण होत आहे.

 सदरील जमीनीच्या वादावरून बुधवारी दुपारी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली असून दोन्ही गटातील अनेक लोक जखमी आहेत.सदरील घटनेची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे व उपविभागीय अधिकारी यांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटातील लोकांना हाकलून टाकले. व सदरील वादग्रस्त जागा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदरील जमीनीवर दोन्ही गटातील लोकांना जाण्यासाठी नकार दिला आहे. दोन्ही गटातील लोकांवार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी सांगितले आहे.

       दोन्ही गटातील लोकांचे भांडणे लावून खेळ पाहणाऱ्यांची संख्या पण जास्त असल्याचीही चर्चा होत आहे. यात त्या लोकांनी आपले चांगभले करून घेत असल्याची चर्चाही शहरातील व्यापारी,नागरिक व शेतकऱ्यांत होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!