घर फिरले की घराचे वासेही फिरतात माजी खासदार चिखलीकरांची अवस्था -कॉ.गंगाधर गायकवाड

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – घरातील कर्त्या आणि कुटुंब प्रमुखावर संकट आले की त्याच्या जवळची माणसे देखील दुर जातात किंबहुना उपयोगी पडत नाहीत.अशीच स्थिती भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची झाली आहे.प्रताप गोविंदराव चिखलीकर (पाटील) यांचा राजकीय प्रवास अनेक राजकीय पक्षांना हुलकावणी देणारा आहे.

अपक्ष,लोकभारती,भाराकॉ,राष्ट्रवादी,शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असा त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे.अशोक चव्हाण यांना शह देणारे नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची जिद्द मात्र २०२४ मध्ये संपुष्टात आली.

प्रताप पाटलांचा जन्म २ ऑगस्ट १९६० रोजी झाला. त्यांनी काँगेस पक्षा कडून १९९९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली परंतु त्यांना यश आले नाही.२००४ मध्ये चिखलीकरांना विधानसभा निवडणुकीत यश आले. त्यांनी अनेक पक्षासोबत दगाबाजी करीत ऐनवेळी हुलकावणी देत यश संपादित केले आहे.

त्यांनी २००७ मध्ये लोकभारती,२०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर २०१४ मध्ये शिवसेनेत व नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून गलिच्छ राजकारणी नमुने दाखविले आहेत.

अमाप पैसा व दारूचे व्यापारी म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती आहे.२०१५ मध्ये त्यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी देखील वर्णी लागली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपा कडून अशोक चव्हाण यांना पराभूत करीत नांदेडचे खासदार झाले. परंतु अशोक चव्हाण यांनी नैतिक हार मानत भाजपाच्या कुबडीचा आधार घेतला आणि याच असंतोषातून दिवंगत वसंतराव चव्हाण खासदार झाले व प्रतापराव निवडणूक हारले.अनेक दिग्गजाना धक्का देत थेट बेईमानी करीत पुन्हा भाजप मित्रपक्ष असलेल्या अजित पवरांच्या फुटीर राष्ट्रवादीत प्रवेश करीत लोहा विधानसभा लढविण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे.

ते निवडणूक लढतील बहीण आणि भावाच्या फैरी झडतील, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील.कुणी पडेल तर कुणी निवडून येईल नंतर सर्वकाही अलबेल आहे असे दाखविण्याचा प्रयत्न होईल.

मी पुन्हा येईल ह्या डावपेचा प्रमाणे ते परत भाजपाचा झेंडा हाती घेतील परंतु इतिहास यांना माफ करणार नाही.कारण घर फिरले की वासेही फिरतात हे लवकरच सिद्ध होईल.लेखक हे माकप नांदेड तालुका कमिटीचे सचिव व पेड न्यूज आर्टिकल’द हिंदू’ इंग्रजी वृतपत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते आहेत.अशी माहिती गंगाधर गायकवाड 

Share This Article
error: Content is protected !!