नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड दिवंगत खासदार कै.वसंतरावजी चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून नायगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.येणाऱ्या काळात मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी आपले मतदान रुपी आशीर्वाद देऊन लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते नागोराव पाटील रोशनगावकर,नांदेडचे माजी उपमहापौर सरजीत सिंग गिल,माजी सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव पाटील भिलवंडे,बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पाटील खतगावकर,उमरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील ढगे ईजतगावकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामचंद्र रेड्डी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख दिलीप पाटील,माजी सभापती जयराम पाटील बाभळीकर,माजी सभापती मारोती कागेरे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी, काँग्रेसचे विठ्ठल कुंडलवाडे,युवक काँग्रेसचे हनमंतराव पाटील नरवाडे, गणेशराव पाटील बाचेगावकर,माजी नगरसेवक सखाराम निलावार,राष्ट्रवादीचे रवी शेट्टी,भगवान पाटील धूपे,माधवराव पाटील शिंगणापूरकर,गोविंदराव पाटील हासेकर,हनमंतराव जगदंबे,प्रकाश पाटील चिंचाळकर,एन.डी.पवार, बालाजी पाटील हातणीकर,शिवाजी पाटील कुश्णुरकर,दत्ताहरी पाटील कावलगुडेकर,बंडू पाटील चव्हाण,पत्रकार मिसाळे गुरुजी,माधव पाटील चोंडीकर,डॉ.शिंदे,निलेश पाटील बाळापूरकर,सुधाकर जाधव,नागोराव वारले,गणपतराव कातरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद सर,युनूस खान,मतीन खान,वेंकटराव पाटील मोरे,बालाजी पाटील शिंदे,बंडू पाटील नरवाडे, साईनाथ पाटील मोकळीकर,शिवराज पाटील मोकळीकर,अफरोज शेख,फुलाजी पाटील शिंदे,पुंडलिकराव कऊटकर,नागनाथराव जिंकले,नरेंद्र रेड्डी, इब्राहिम चिकनेकर,नागोराव कमलाकर, शेख अल्ताफ,शेख अल्ताफहुसेन,विजय पाटील पांगरीकर,जावेद करखेलीकर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सय्यद सुलताना,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सौ मीना भद्रे,सुजाता मागणे राष्ट्रवादीच्या राजश्री पाटील बाभळीकर,गणेश पाटील जगदंबे,विलास पाटील शिंदे,संजीव कुमार गायकवाड,सतीश बोधनकर यांच्या बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.