मुदखेड प्रतिनिधी राहुल कोलते
मुदखेड – कामजळ शिवारात विजेचा शॉक सर्किट होऊन दुपारी दोन अडीचच्या सुमारास 25 ते 30 एकर ऊस जाळून खाक झालेला आहे. ऊसाला आग लागली आहे असे समजतात कमळज गावातील ४० ते ५० शेतकरी आग विझवण्यासाठी आले तरी आग विझत नाही. कमळज येथील शेतकरी मोहन प्रकाश खानसोळे गट नं (२८७ )गोपीराज खानसोळे, भारत जाधव, प्रशांत खानसोळे, दिगम्बर खानसोळे, या सर्व शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालेला आहे. घटनास्थळी कैलास खानसोळे, गणेश खानसोळे नंदकिशोर, प्रकाश खानसोळे, प्रकाश ढगे महाटीकर, आनंदराव भोग आदी उपस्थित होते.