विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड पोलिसांचा रूट मार्च. 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

आचारसंहिता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही! – सपोनी जाधवर

नांदेड जिल्हाप्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

नांदेड – विधानसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर पासून राज्यात लागलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील वाई बाजार परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये य यासाठी खबरदारी म्हणून, सिंदखेड पोलिसांच्यावतीने महत्त्वाचे पाऊल उचलत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च काढण्यात आला. 

यावेळी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार

सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ठाणे हद्दीतील वाई बाजार परिसरात पोलिसांच्या वतीने रुट मार्च काढण्यात आला.

यावेळी बोलताना सपोनी जाधवर यांनी “कायदा सुव्यवस्थेचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे, कोणतीही व्यक्ती जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित नागरिकांनी सिंदखेड पोलिसांशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता कायद्याचे पालन करत कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उलंघन होणार नाही याची दक्षता घेत आदर्श आचारसंहितेचे पालन करत 100 टक्के मतदान करावे!”असे नागरिकांना सूचना वजा आवाहन केले.

नांदेड पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने सिंदखेड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सदरील रुटमार्चमध्ये बी एस एफ च्या काही तुकड्या, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.हा रूट मार्च वाई बाजार बस स्टॉप ते वाई बाजार गावातील मुख्य बाजारपेठ असा आयोजित करण्यात आला होता..

Share This Article
error: Content is protected !!