पोस्टे अंबाजोगाई ग्रामीण अंतर्गत घडलेल्या; खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपीतांना सिंदखेड पोलीसांनी चार कि.मी.थरारक पाठलाग करुन पकडले

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

सिंदखेड पोलीसांची उत्कृष्ट व धाडसी कामगीरी

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने सर्वच प्रशासकीय विभाग हे विलक्षण अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येत असताना,दुसरीकडे मात्र, संपूर्ण बिड जिल्ह्याला एका ऊसतोड मुकदमच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने हादरवून सोडले होते.खुन करुन फरार झालेल्या तीन आरोपींना पकडण्याचे मोठे चॅलेंज अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांपुढे उभे ठाकले होते.
दरम्यान, पोलिस अधीक्षकांचे आदेश मिळताच, माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडवर येत या खुन प्रकरणातील तीघांही आरोपींच्या शनिवारी 02 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा.च्या सुमारास ठाणे हद्दीतील पालाईगुडा शिवारातील शेतात जवळपास चार तास फिल्मीस्टाईलने थरारक पाठलाग करत मुस्क्या आवळल्या.या धाडसी कामगीरीच्यामाध्मातून सिंदखेड पोलिस ठाण्याच्या जिगरबाज पोलिसांनी “कानून के हाथ बहुत लंबे होते हैं” चा वास्तविक थरारक परीचय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दिला आहे तर सर्वसामान्य जनतेच्या मनात ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा वास्तवात खरे करून दाखवले.

याघटनेमागील पार्श्वभूमी अशी कि,
माहूर तालुक्यातील लसणवाडी येथील यमराज धरमसिंग राठोड वय 32वर्ष,
शुभम चंद्रकांत पवार वय 20वर्ष राहणार सिडको नांदेड आणि करण देविदास राठोड वय 22वर्ष राहणार नमस्कार चौक, नांदेड या व्यवसायाने ऊसतोड कामगार असलेल्या तीघा आरोपीतांनी संगणमत करून सचिन शिवाजी तिडके वय ३५ वर्ष या व्यवसायाने ऊसतोड मुकदम राहणार भोगलवाडी या.धारुर हल्ली मुक्काम त्याची सासरवाडी असलेल्या डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई जि.बिड यास ऊसतोडीचे पैशाचे आर्थिक व्यवहारातून दि.29/10/24 रोजी रात्री 08:15 वा.ते दि. 30/10/24 चे दरम्यान शेतात नेऊन बळजबरीने दारू पाजून दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे खुन करून पळून गेल्याची फिर्याद मयत सचिनचे वडील शिवाजी सिताराम तिडके यांनी 30 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा.च्या सुमारास पोलिस ठाणे, अंबाजोगाई ग्रामीण जिल्हा बिड येथे दिल्यावरून आरोपीतांविरुद्ध गु.र.नं. 327/2024 कलम 103, 3(5) भा.न्या.सं- 2023
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी मात्र फरार होते.
पोलीसांचा शोध सुरू होता.
दरम्यान,सदर खुनातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता शेख, पोनि स्थागुशा बिड, पडवळ पोनि अंबाजोगाई ग्रामीण जि. बिड यांनी पोस्टे सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर यांना फोन वरुन माहीती दिली होती. त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीसांनी गोपनिय माहीती काढुन आरोपींचा सुगावा लागताच सदर हकीकत अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांना संपर्क साधुन सांगीतली असता पोलीस अधीक्षकांनी त्यांना पकडुन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यावरुन आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हे ॲटोमधे बसून जात असल्याची माहिती मिळताच तात्काळ आरोपीतांना पकडण्या करीता पाठलाग करीत असतांना तीन्ही आरोपी हे पलाईगुडा गावात ॲटो सोडुन पळून जात होते. त्यांचा एखाद्या चित्रपटातील थरारक घटनेतील दृष्याप्रमाणे सतत चार किलोमीटर पाठलाग करुन पकडुन त्यांचे नाव गाव सर्व माहीती घेवुन सिंदखेड पोलिसांनी ताबडतोब अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांना तिन्ही आरोपीतांना पकडल्याची माहीती दिली. त्यावरुन
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक बिड यांना आरोपी पकडल्याची माहिती दिल्याने आरोपी ताब्यात घेणे करीता अंबाजोगाई ग्रामीण जि.बिड पोलीसांचे पथक पोस्टे सिंदखेड येथे दाखल झाले असून आरोपी ताब्यात देण्याची प्रक्रिया दि.02 नोव्हेंबर रोजी चालु होती.
अशा प्रकारे सिदंखेड पोलीसांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या खुनातील गुन्हेगारांचा चतुराईने सुगावा काढत मोठ्या धाडसाचे परीचय देत पकडुन बेड्या ठोकल्या.या यशस्वी मोहीमेतून गुन्हेगारी प्रवृत्तीचा खात्मा करण्यासाठी तर सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे ताजे उदाहरण सिंदखेड पोलिसांनी सर्वांपुढे सादर केले असून, त्यांच्या या उत्कृष्ट धाडसी कामगीरीबद्दल नांदेड व बिड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सपोनि रमेश जाधवर व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुकासह अभिनंदन केले असून, जनतेमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार अबिनाश कुमार,पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक,भोकर, सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली रमेश जाधवर, सहायक पोलीस निरीक्षक पोस्टे सिंदखेड 2) ,मडावी, पोलीस उप निरीक्षक, पोस्टे सिंदखेड,पोहेकॉं पठाण, पोना मडावी, हुसेन, पोकॉं शेंडे पोस्टे सिंदखेड ता.माहूर यांनी सदरील खुनाच्या खळबळजनक घटनेतील फरार असलेल्या तिघा आरोपींना दिनांक 02.11.2024 रोजी 10.00 वा. पालाईगुडा शिवारातील शेतात पोस्टे सिंदखेडच्या हद्यीत नदी, कापसाचे शेत, जंगलात चार कि.मी.अंतर थरारक पाठलाग करुन पकडले आहे.#

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!