धर्माबाद तालुक्यातील गोरगरीबांच्या धान्यावर दलालांचा डल्ला !! राशनचे धान्य थेट काळ्या बाजारात विक्री

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

प्रशासन बग्याच्या अर्थ पूर्ण भूमिकेत

धान्यावर डल्लेबाजावर कार्यवाही कधी

धर्माबाद तालुका प्रतिनिधी सोमेश स्वामी

धर्माबाद :-शासन दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते.महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून, रेशनिंगचा गहू,तांदूळ खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात आहे.धर्माबाद मधून दर दोन ते तीन दिवस आड हैदराबाद ते गुजरात रेशनचा तांदुळ मोठ्या प्रमाणात गुजरातला चौदा टायरी ट्रक द्वारे गुजरात ला पाठवला जातो यात जिल्ह्यातुन मोठे अधिकारी पासून तालुक्यातील कमर्चारी यांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे या वर एल.सी.बी.डिपार्टमेंट राजकारणी पुढाऱ्यांचा हसतशेप असल्याची गोपनीय माहिती मिळत आहे.

     हैदराबाद राज्य महामार्गावरून थेट बाहेरच्या राज्यात जात असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे काळ्या बाजारात दर दोन ते तिन दिवसाला ट्रक मध्ये साधरणता चाळीस ते पंचेचाळीस टन रेशनचा तांदूळ काळ्या बाजारत जात असतात शंका येऊ नहे म्हणून GJ पासींगच्या गाड्या वापरल्या जातात यात महत्वाची बाब अशी की तालुक्यातील एक व्यक्ती प्रमुख भुमीका निभावत असतो त्याचा त्याला दर महिन्याला मोबदला दिला जातो एलसीबी चा एक अधिकारी या नियंत्रण ठेवत असतो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याची देखभाल करत असतात माहिती सत्व काही गोपनीय माहितीनुसार गाडीला कोणी अडवल किवा थांबवल्यावर स्थानिक पोलीस प्रशासन व काही एल सी बी अधिकाऱ्याचा थेट फोन काॅल येत असल्याची माहिती मिळत आहे या काळ्या बाजारात जाणारा तांदुळ मोठ्या प्रमाणात त्या त्या तालुक्यातील प्रशासन व अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे जिल्हातील अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे माहिती मिळत आहे या सर्व प्रकरावर जनतेतून मोठा प्रश्न निर्माण झाला तरी गोरगरीब जनतेचा थोडातून घास हिसकावून बाहेरच्या राज्यात काळ्या बाजारत तांदूळ व्रिकी केला जात आहे काही लाभार्थी तांदूळ तर काही लाभार्थी गहू विक्री करीत आहेत.

      जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लोक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे तांदूळ शेजाऱ्या बाजारात ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लाभार्थी गव्हाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते. परंतु तांदूळ एका व्यक्ती मागे 4 किलो तांदूळ मिळत असल्याने तांदूळ वापर करीत नाहीत.स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारही प्राप्त होत नाही.यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही.जो मुळ राशन कार्ड धारक आहेत त्याना राशन मिळत नाही.यातून दलालांचे मात्र चांगभले होत आहे व संबंधित विभागाचे व प्रशासनाचे खिसे भरल्या जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!