नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – तख्त सचखंड श्री हजुर अबिचलनगर साहिब, नांदेड मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांनी कतक सुदी दुज ०४ ऑक्टोबर १७०८ रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांना जुगो जुग अटल गुरु गद्दी प्रदान केली आणि साध संगतला आदेश दिला “माझी आत्मा ग्रंथ मध्ये आणि माझे शरीर पंथ मध्ये आहे”.श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी समोर पाच पैसे आणि नारळ ठेवून नतमस्तक होऊन सर्व संगतला आदेश दिला “आगिया भई अकाल की तभी चलायो पंथ,सब सिक्खन को हुकम है गुरु मानियो ग्रंथ”
०३ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांच्या गुरुतागडी गुरुपुरब अति उत्साहाने साजरा करण्यात आला.प्राचीन परंपरेनुसार गुरुद्वारा श्री नगीना घाट साहिब येथून सकाळी आठ वाजता गुरुतागढी नगर कीर्तनची सुरुवात झाली.सोनेरी सुंदर पालखी च्या गाडीत श्री गुरु ग्रंथ साहिब जी स्थापित होते जो सुंदर फुलांशी सजलेली होती. गतका पार्टी, भजन मंडली आणि हजारों भाविक या नगर कीर्तनात समाविष्ट होते.
परंपरेनुसार तख्त सचखंड साहिब येथे नगर कीर्तनाच्या आरंभतेच्यावेळी तोपांची सलामी दिली गेली.नगर कीर्तन तख्त सचखंड साहिब येथे पोहोचल्यावर हजर असलेल्या संगतेने श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचा शस्त्रांसह अभिवादन केला. तख्त सचखंड श्री हजुर साहिबचे आदरणीय जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि सर्व पंज प्यारे साहिबांच्या हजेरीत गुरुतागद्दी नगर कीर्तन संपन्न झाला. या वेळी सिंघ साहिब भाई कश्मीर सिंघ जी हैड ग्रंथी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी चा हुकमनामा घेतला आणि श्री गुरु ग्रंथ साहिब जी च्या गुरुतागद्दीची कथा (साखी) सांगितली. या विशेष प्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.स.विजय सतबीर सिंघ पूर्व आई.ए.एस.आणि स. जसवंत सिंघ बॉबी यांनी नगर कीर्तनात सहभागी झालेल्या भाविकांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.
याच दिवशी संध्याकाळी श्री गुरु ग्रंथ साहिय भवन मध्ये गुरपूरब दुज पंचमीला समर्पित विशेष गुरुमत समागम सुरु झाला,हा समागम दि.०७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुरु राहील. या कार्यक्रमा मध्ये उच्च कोटीचे कीर्तनकार, कथाकार, संत महापुरुष आदि सहभागी होणार आहेत.गुरुमति समागमांचे थेट प्रक्षेपण हजूर साहिब लाइव,यूट्यूब, फेसबुक वर दाखविले जाणार आहे.
अशी माहिती अधिक्षक, गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांनी प्रेस पत्रकाद्वारे दिली.