तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचे फोटो लावून महाराष्ट्रात मतदान द्या हे कुठलं लॉजिक आहे – खा.अशोकराव चव्हाण 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

अभिषेक बकेवाड|नांदेड – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचे फोटो लावून मत मागतात एवढी केविलवाणी अवस्था महाविकास आघाडीचे आहे. तेलंगणामध्ये असं झालं म्हणून महाराष्ट्रात मतदान द्या हे कुठलं लॉजिक आहे? आमच्याकडे कुठले वाद नाहीत, सगळ्यांमध्ये एक वाक्यात आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार ही रेस सुरू झाली आहे. अवस्था अशी झाली आहे एक अनार सौ बिमार…, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाणांकडून मोदींच्या कामाचं कौतुक

   आपली उपस्थिती सांगून जात आहे, ही येणारी विधानसभा निवडणूक महायुती नक्कीच जिंकणार आहे. तिसऱ्यांदा यशस्वी पंतप्रधान म्हणून मोदींनी शपथ घेतली आहे. नांदेडसाठी त्यांच्या मनात वेगळी आत्मियता आहे.. विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड करण्याची आत्मीयता त्यांच्या मनात आहे. आम्ही निवडून आल्यानंतर मोदींनी शंभर दिवसाचा प्लॅन घोषित केला होता. त्यांनी बरोबर 100 दिवसात पायाभूत सुविधा कार्यक्रम दिला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

Share This Article
error: Content is protected !!