काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण सोडवला : एकनाथ शिंदे

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

हदगाव व हिमायतनगर शहराला एम आय डी. सी. मंजूर करून देणार…

अभिषेक बकेवाड/

हिमायतनगर – राज्य शासनाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून दिवाळीची ओवाळणी दिली. लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यासाठी विरोधक मात्र कोर्टात गेले.

 परंतू तेथे त्यांची ही डाळ शिजली नाही. आणी म्हणून अश्या या सावत्र भावाला त्यांची आता जागा दाखवून देण्याची ही वेळ असून, येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ द्या.

हदगाव व हिमायतनगर शहराला एम आय डी. सी. मंजूर करून देतो,साथ साथ ही साथ शेतकर्‍याच्या कर्जमाफीचा ही निर्णय घेण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हिमायतनगर येथे ता. ८ शनिवारी परमेश्वर मंदिर बसस्थानकाच्या प्रांगणात शिवसेना, भाजप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभा संपन्न झाली. सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

    पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काँग्रेस वाले म्हणाले की, भाजप शिवसेनेचे सरकार संविधान बदलणार, असे खोटे दावे विरोधक करीत आले. परंतू आम्ही कदापी घाबरणारे नाही. विरोधकांना पुरून उरलो. केवळ आपली साथ हवी आहे. आम्ही अडीच वर्षापुर्वी बंड केलं. उबाठाच्या लोकांनी सत्तेच्या मोहापायी शिवसेनेचा धनुष्यबाण कॉग्रेसकडे गहाण ठेवला होता.

       आम्ही बाळासाहेबांच्या विचाराना तडा जावू देणार नाही. याची शपथ घेतली. आणी शिवसेनेचा धनुष्यबाण आम्ही सोडून आणला. अनेक विकासाची कामे तर केलीच, परंतू बाळासाहेबांच्या विचाराचे पावित्र्य आम्ही राखले आहे. बाळासाहेबांचं हिंदूत्वाचा जागर आम्ही करतो आहोत, हेच उबाठा वाल्यांना सहन होत नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिदे म्हणाले.

      पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठाचे माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, माजी जि. प. सदस्य अनिल पाटील बाभळीकर, काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, काँग्रेस सेवादलाचे जिवन आडे, माजी नगरसेवक सावन डाके, यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हिंगोलीचे माजी खासदार तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील, जेष्ठ नेते गोपाल सारडा, उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, प्रतापराव देशमुख सरसमकर, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, सुधाकर भोयर, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, प्रा. मगरे, गुणवंत पाटील हंगरगेकर, विजय वळसे पाटील,ता‌.प्रमुख राम ठाकरे , ता. अध्यक्ष भाजपा गजानन चायल,गजानन हाडपकर, संतोष नरवाडे,आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

Share This Article
error: Content is protected !!