समाजातील युवकांनी समोर येऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे -प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड
भोकर प्रतिनीधी/
भोकर – प्रदेश अध्यक्ष सन्माननीय भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखालील रायखोड ता.भोकर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत समाजाबद्दल विविध संदर्भात चर्चा करण्यात आली.
भुमन्ना आक्केमवाड बोलताना म्हणाले की मागच्या काळात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे महाराष्ट्राचे नेतृत्व ज्याच्या हातात दिलं त्यांनीच समाजाचा विश्वासघात केला आहे आपण डोळ्यासमोर पाहत आहे, मी समाजसेवेत ई.स 1990 पासून कार्यरत करत असतानां भोशी येथील शाखा प्रमुख ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले पन मी माझ्या आयुष्यात कोणत्याही पक्षाला समाजाला नेऊन दावणीला बांधले नाही, समाजातील युवकांनी समोर येऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समाजकार्य करणाऱ्या समाज बांधव एकसंघ संघटन मजबूत झाले तर गोल्ला गोलेवार यादव समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन भुमन्ना आक्केमवाड यांनी केले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश रामपुलवार,हनुमंत पुपलवाड, नारायण पापुलवाड, सुनील कोईलवाड, मारोती भुज्जेवाड, बालाजी चिकलवाड, हनुमंत आरकलवाड, शिवाजी कारलवाड, पुंडलिक कोईलवाड, व्यंकटी कोईलवाड, बालाजी बयेवाड, महेश पापुलवाड,किशन बहिरवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समाज बांधव यांनी समाजसेवे साठी प्रदेश अध्यक्ष श्री.भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे.