प्रशासन झोपतो एसी ऑफिस मधी जनतेच्या आसुविधे बद्दल जागणार कधी !

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

स्थानिक स्वराज संस्थे चे निवडणूक होत नसल्याने प्रशासका मुळे जिल्यात जनतेचे हाल

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील सर्वच नगरपालिकेवर शासन निवडणूक घेत नसल्यामुळे प्रशासका मार्फत जनतेला सेवा देण्याचे कागदोपत्री कामे केली जात आहेत.

     लोकसेवकांनो भरभराट पगार घेता तर आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने इमानदारीने का पार पाडत नाहीत.प्रत्येक वेळी आवाज उठवून जागे केले तेंव्हा हालचाल केली.जर वेळोवेळी आवाज उठवावा लागत असेल तर मग तुम्ही पगारी घेऊन एसी केबिनमध्ये बसून अधिकारी पना करता.फक्त दिखावा रूपी आदेश देत निष्काळजी पना करता.आपल्या आदेशाचे पालन होत आहेत का..? कधी बघितलं का…? कामचुकार पना करत दिखावा रूपी कर्तव्य पार पाडत आहेत हे पण स्पष्ट दिसते.म्हणुन कचरा तर उचलला पण दुर्गंध आता पण अतिशय खाण येत आहे. आणि घाण तर तशीच आहे.त्यामूळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम असुन जर का काही अनुचित घटना घडली तर याचा जबाबदार कोण…? त्यासाठी काय उपयोजना केली आहे. अजून परिसरात आजूबाजूला कचरा तसाच पडलेला आहे.

     जर का योग्यरीत्या आपले कर्तव्य बजावाल तर कोणत्याच प्रकारचे तक्रार ही प्रशासना विरोधात घेतली जाणार नाही. योग्यरीत्या आपले कर्तव्य पाळा आणि योग्य त्या सोयी सुविधा पूर्वा असे प्रशासनाला विनंती आहे. तरीही दुर्गंध पसरण्यापासून रोखण्यासाठी आणि आजूबाजूतील पसरलेला कचरा ते योग्यरित्या उचलून घेण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने हालचाल करावी. 

    तरी महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब यांना सुद्धा विनंती आहे. की जर एसी केबिनमध्ये बसून जर बाहेर येण्याची वेळ असेल तर एकदा आपण शहरातील फेरफटका मारावा आणि आपल्या नेत्राने ठीक ठिकाणी अशा प्रकारे गैर सुविधा आणि नागरिकांना कश्या प्रकारे त्रास होत आहे. यावर किमान आपले नेत्र त्या गैर सुविधा होत. असलेल्या गंभीर विषयावर सुद्धा पाडावे अशी आपणास कळकळीची विनंती ही या परिसरातील नागरिक करीत आहेत.

    शासनाच्या घनकचरा उपाय योजनेच्या जीआर नुसार महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घरातील,आस्थापना आणि परिसरातील सुका कचरा व ओला कचरा उचलण्यासाठी घंटागाडी,कचऱ्याच्या गाड्या उपलब्ध करून दिले.असून सुद्धा ते किती प्रमाणात शहरात जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्याचीही माहिती द्यावी.

   तसेच महानगरपालिका प्रशासनामार्फत स्वच्छ शहर सुंदर शहर या सकल्पनेत नुसार आजवर रोजच्या दैनंदिन दिनामध्ये किती वेळेस स्वच्छते बद्दल जनजागृती केलेली आहे.आणि करत आहे 

   याची सुद्धा माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रसार माध्यम वृत्तपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून माहिती पुरवावी.जर का यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांच्या हलगर्जी व कामचूकारूपणा निदर्शनास आल्यास त्यांच्यावर योग्य ती आणि कठोर कारवाई करणार का….? जर वेळोवेळी निदर्शनास आणून देखील आजवर कशा पद्धतीने आणि किती संबंधित लोकांवर कारवाई केल्या आहेत.याचही उत्तर प्रशासनाने द्यावे.

Share This Article
error: Content is protected !!