ई-केवायसी न केल्यास राशन कार्ड बंद ,कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी करणे बंधनकारक – तहसीलदार पल्लवी टेमकर 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

गावपातळीवर असलेल्या रास्त भाव दुकानांमध्ये ई केवायसी निःशुल्क प्रकिया सुरू आहे 

अभिषेक बकेवाड| हिमायतनगर शिधापत्रिकेवर वितरित धान्य वितरणाच्या लाभार्थीची माहिती अद्ययावत करण्यासाठी पडताळणी प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्दे श दिले आहे .

शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही 31 डिसेंबर अखेरपर्यंत करावेत असे आवाहन तहसीलदार मॅडम पल्लवी टेमकर यांनी केले आहे.

 ई-केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा असे तहसीलदार टेमकर मॅडम यांनी म्हटले आहे.

 ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे, हा एकमेव उद्देश आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थनि आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. 

तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसीसाठी निःशुल्क प्रक्रिया सुरू आहे ई-केवायसी पडताळणीसाठी लाभाध्यानी आधारकार्ड सोबत घेऊन रेशन दुकानात येणे आवश्यक आहे. 

पूर्ण झाल्यावरच लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे.

Ekyc सर्व नागरिक यांनी करून घ्यावे पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक पुरवठा विभाग तहसील कार्यालय हिमायतनगर.

Share This Article
error: Content is protected !!