धर्माबाद येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा यशस्वीरीत्या संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड जिल्यातील नायगाव विधानसभा वनांदेड लोकसभा चे उमेदवारांच्या प्रचारर्थ सुप्रसिद्ध भारताचे शायर आणि खासदार इमरान प्रतापगडी यांच्या प्रमुख उपस्थितीथीतीत महाविकास आघाडीच्या धर्माबाद येथील जाहीर सभेच्या यशाचा आणि त्यांच्या विकासवादी विचारांचा प्रतिसाद याचे विविध पैलू पाहता येणारी २० तारीख इतिहास घडवेल असा विश्वास याप्रसंगी वाटला.
“महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केले!”
महाविकास आघाडीच्या विकासवादी विचारांना मिळालेला प्रतिसाद हा आमच्या यशाची खात्री देतो!”प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेत सर्वांची कामे करू असा विश्वास डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला.सदरील सभेच्या अध्यक्षस्थानी मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांची उपस्थिती होती.
आपल्या शेरो शायरीच्या अंदाजाने खासदार इमरान प्रतापगडी यांनी धर्माबादवासियांना मंत्र मुग्ध केले.
याप्रसंगी जहीराबादचे खासदार तथा प्रभारी खा.सुरेश शेटकर, सोमेश्वर रेड्डी,आमदार वकाटी श्रीहरी,माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,तेलंगणाचे माजी मंत्री शब्बीर आली,माजी आमदार ललिता ताई,माजी आमदार सुवर्णाताई,सभापती शिरीष भाऊ गोरठेकर,माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर,जाकिर चाऊस, गोविंदराव पाटील करखेलीकर, माजी सभापती संजय आप्पा बेळगे,नागोराव पाटील रोशन गावकर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे,सय्यद रहीम,अरुण पाटील एकंबेकर,काँग्रेसचे प्रवक्ते मुन्तजीब,शिवसेनेचे दशरथ लोहबंदे,बाळासाहेब पाटील खतगावकर,माजी नगराध्यक्ष सत्तार सेट,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप पाटील चिकनेकर,प्रल्हाद पाटील ढगे इजतगावकर,सभापती रवी पाटील खतगावकर,माजी उपनगराध्यक्ष रमेश तिवारी,जुनेद भाई,विठ्ठल कुंडलवाडे,गोविंद हनवटे, इमरान भाई शिरजखोड,युनूस खान,सदाशिव पुपलवाड, आनंदराव येलमगोंडे,सय्यद इसाक नरसीकर,सुधाकर देशमुख,जयराम पाटील बाभळीकर,शिवसेनेचे गणेश गिरी,पांडुरंग पांचाळ,हनुमंत जगदंबे,जावेद सर,सुभाष किनाळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड,घंटोड जारीकोटकर,वाजिद अली, डॉक्टर रत्नाळीकर शिवराज पाटील मोकळीकर,रवी शेट्टी,आबेद अली,शिवसेनेचे रामचंद्र रेड्डी,युवक काँग्रेसचे माजी नगरसेविका सौ.निता गायकवाड आकाश पाटील ढगे,दिगंबरराव लखमावाड,गंगाधर पाटील नरवाडे,साईनाथ निवळे,संजीवकुमार गायकवाड,साजिद शेख फुलवाले,मोहन पाटील कार्लेकर,सोनू वाघमारे, नागनाथ आनंदवाड,बालाजी कारेगावकर,बंडू पाटील पाटोदेकर,धनराज गायकवाड,परवीण शेख,सय्यद सुलताना,मीना भद्रे,मुबीन लाला,अफरोज शेख,बाबर शेख,शुभम शिवशेटे,बालाजी पाटील पाटोदेकर,साई पाटील, लक्ष्मण पाटील जाफलापुरकर, बालाजी पाटील कदम बेलूरकर,बालाजी कुदाळे, रामजी जाफलापुरकर,सुधाकर जाधव बाळापूरकर,अकबर भाई, अफरोज भाई,भीमशक्ती धर्माबाद तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड,श्रीकांत पाटील नरवाडे,दिलीप पाटील यांच्यासह नायगाव उमरी धर्माबाद येथील बहुसंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.