हिमायतनगर शहरात लहुजी वस्ताद साळवे यांची 230 व्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण करून उत्साहात साजरी…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

अभिषेक बकेवाड| हिमायतनगर – शहरात डॉ अण्णाभाऊ साठे नगर येथे अद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 230 व्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण करून उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

क्रांतिगुरू आद्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याविषयी मान्यवरांनी माहिती दिली तसेच त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. तरूणांच्या समाजाभिमुख कार्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. महापुरूषांच्या जन्मोत्सवातून सामाजिक संदेश देतानाच समाजाची गरज विचारात घेतली गेली पाहिजे.आजच्या जयंतीच्या निमित्ताने ही भूमिका घेतली गेली असल्याचे मान्यवरांनी सांगितले आहे लहुप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी उपस्थित प्रा. सुरेश जाधव सर, प्रमेश्वर बनसोडे सर,संतोष बनसोडे, संतोष हातवेगळे,संदीप गुंडेकर, मारोती नामदेव गाडेकर,बालाजी शिराने संजय गुंडेकर सुरेश तपासकर, चंदू भालेराव,गजानन वाघमारे, विकास गोरे व सर्व समाज बांधव उपस्थिती होते.

Share This Article
error: Content is protected !!