श्रीजयाच्या नावातच जय असल्याने या निवडणुकीत ती नक्की प्रचंड बहुमताने विजयी होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भोकर ता.प्रतिनिधी/

भोकर – श्रीजयाच्या नावातच जय असल्याने या निवडणुकीत ती नक्की प्रचंड बहुमताने विजयी होईल आणि हा वारसा समर्थपणे पुढे नेईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

  भोकर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याप्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची भोकरमध्ये सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील महिलांच्या सन्मानासाठी आपण लाडकी बहीण योजना सूरु केली, तसेच फक्त लाडकीच नव्हे तर सुरक्षित बहीण देण्यासाठी २५ हजार महिला पोलिसांची भरती करतोय. लाडक्या भावांना स्टायपेंड देणारी योजना देखील आपण सूरु केली आहे. शेतकऱ्यांना साडे सात एचपी पर्यंत वीजबिल माफ करायचा निर्णय आपण घेतला आहे, खतांवरील सबसिडी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. हे देणारे सरकार असल्याचे नमूद करत आगामी निवडणुकीत श्रीजया चव्हाण आणि संतुकराव हंबर्डे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असेही त्यांनी सांगितलं.

Share This Article
error: Content is protected !!