उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे उमरी
उमरी-जिल्ह्याच्या राजकारणात नव्या नेतृत्त्वाचा उदय..दुसर्यांदा संघर्षाची लढाई विजयापर्यंत नेण्याचा संकल्प करीत नायगाव मतदार संघातील लोकप्रिय मा.आ.राजेश पवार यांच्या प्रचारार्थ लाखोंचा समुदाय उमरी मोढा मैदान येथे उपस्थित होते.
भाजपा उमेदवार राजेशजी पवार यांच्यासाठी जमलेल्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने अवघ्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. विद्यमान मा. मंत्री मा.खासदार यांच्या सुनबाई यांच्याविरुद्ध यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे.मतदार संघातील कामे सामान्य लोकांच्या वाढत्या पाठिंब्याची साक्षच आजच्या नामांकन अलोट गर्दीच्या साक्षीने या संघर्षाची लढाई विजयापर्यंत नेण्याचा संकल्प करीत राजेश पवार यांना
आज या सभेत तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने आलात हे पाहून आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे असे मा.राजेश पवार यांनी सांगितले. आता ही तुमची आमची संघर्षाची लढाई लवकरच विजयापर्यंत नेऊ.हा राजेश पवार तुमच्या प्रत्येक सुखादुःखात सदैव मदतीसाठी उभा असेल फक्त माझ्या मुलांना आशिर्वाद द्या बाकी काही नको मि सदैव तुमच्या सेवेत कार्यरत राहिन अशी ग्वाही सभेत असा आत्मविश्वास व्यक्त केला.
अन्यायाविरुद्ध असलेल्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याची यावेळी ग्वाही दिली.नायगाव मतदार संघात मंगल कार्यालय, सिंचन,बेरोजगार तरुण कामे,आरोग्य,बॅकवॉटर,दफनभूमी,ग्रामीण रुग्णालय, गाय गोठा,हुतात्मा स्मारक, मराठा,समाजासह प्रत्येक जातीचे विविध मागणी असे अनेक उर्वरित कामे करण्याची संधी पुन्हा मतदान च्या आशीर्वाद स्वरूपात द्यावेत मतदारसंघाच्या उज्ज्वल करण्यासाठी संधी द्यावी.
यावेळी मा.मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब,राजेश पवार, राजेश कुंटुरकर,कवळे सर,वसंत सुगावे,संजय कुळकर्णी, डाॅ.विक्रम देशमुख,ज्ञानेश्वर सावंत,गजानन माली पाटील, खाजासेठ, सुभाष पेरेवार,ज्ञानेश्वर कदम,शिवाजी शिंदे,श्रीनिवास अनंतवार, पत्रकार बांधव सह प्रचंड मतदार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन किशोर कवडीकर यानी केले, उमरी,धर्माबाद,नायगाव भागातील अलोट रेकॉर्ड ब्रेक मतदार उपस्थित होते.