कॉंग्रेस महाराष्ट्रात दोन्ही पक्षांना सोबतच घेऊन बुडणार….
पुणे : काँग्रेसची स्थिती नाजूक आहे. काँग्रेस ज्यांच्या गळ्यात पडते त्या पक्षांचे बुडणे निश्चित आहे. राज्यात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे या पक्षांचे बुडणे नक्की असल्याची टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केली. काँग्रेसची स्थिती बिकट असून ती आपल्या पायावर पुन्हा उभी राहू शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
भारतीय जनता पक्ष महायुतीचे शिवाजीनगरचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राजनाथ सिंह यांची बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) संजय सोनवणे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते.