ता.प्रमुख नाईक यांचा पदाधिकाऱ्यांना फर्मान व भाजपाला इशारा भाजपसाठी ‘वेक अप-कॉल’
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर- “शिवसेना शिंदे गट ताकदीनिशी किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांच्या पाठीशी!” असा माहूर तालुका संघटक विनोद सूर्यवंशी यांनी अवघ्या दोनच दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केलेला ठाम विश्वास शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक (राठोड) यांनी फोल ठरवला असून,दि.१६ रोजी त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका बैठकीत महायुतीच्या भाजपाचे उमेदवार असलेले आ.भीमराव केराम हे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महायुतीची बैठक बोलावून त्यांना विश्वासात घेऊन योग्य मानसन्मानाची वागणुक न देता प्रचारासाठी एकला चलो रे ची भुमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केला असून,आत्मसन्मान दुखावलेला तालुका शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी महायुतीचे भाजपाचे उमेदवार/आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे.प्रचारासाठी अवघ्या दोनच दिवसांचा कालावधी उरला असताना माहूरच्या महायुतीत मानापमानाचे नाट्य रंगले असून,
शिवसेना ता.प्र.सुदर्शन नाईक यांनी ऐणवेळी घेतलेला हा आश्चर्यकारक निर्णय भाजपसाठी सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक मोठा ‘वेक अप कॉल’ ठरणार आहे.
राज्यात सध्या भाजपा, शिवसेना (ए.शिं.) व राष्ट्रवादी (अ.प.) आणि इतर मित्र पक्षांसह विधानसभा निवडणुक लढवित असलेल्या महायुतीतील या ना त्या कारणामुळे उडत असलेल्या खदखदीचे लोण आता किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातदेखील पोहचले असून,
महायुतीच्या भाजपाचे उमेदवार असलेले आ.भीमराव केराम हे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महायुतीची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेत योग्य मानसन्मानाची वागणुक न देता प्रचारासाठी एकला चलो रे ची भुमिका घेत असल्याचा गंभीर आरोप माहूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी भाजपावर केला आहे.विशेष म्हणजे,महायुतीतर्फे सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरण्याआधी किनवट विधानसभेसाठी शिवसेनेकडून माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक हे देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते.परंतू,ही जागा रणींग आमदार याठिकाणी भाजपाचा असल्याने ठरल्यानुसार भाजपसाठी सोडण्यात आली.
भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी मिळाली. परंतु,पक्षश्रेष्ठी आणि विधानपरिषद सदस्य,मंत्री दर्जा आ.हेमंत पाटील तसेच वरीष्ठांचे महायुतीच्या उमेदवाराचा मग तो कोणत्याही घटक पक्षांचा असो इमानेइतबारे प्रचार करण्याचा आदेश जरी असला तरी,भाजपाकडून महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य प्रकारे मानसन्मानाची वागणुक देत प्रचारात सामिल करुन घेतले नसल्याची सुरुवातीला ऐकू येत असलेली खदखद आता ऐण मतदानाच्या तोंडावर चव्हाट्यावर आली आहे. महायुतीतील भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव केराम हे किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असताना व नुकतेच बाळसं धरलेल्या शिवसेना (ए.शिं.) पक्षाचे तर आणखी बिजांकुरही न फुटलेल्या राष्ट्रवादी (अ.प.) यापैकी राजकीय बालेकिल्ला असलेल्या भाजपासाठी कि, इतर कोणाच्या पथ्यावर पडणार या प्रश्नाचा उलगडा त्वरीत मतदानापूर्वी न केल्यास याचे विपरीत परिणाम या निवडणुकीवर विशेषतः भाजपाच्या उमेदवारावर निश्चितच पडणार आहेत. कारण,शिवसेना माहूर तालुका प्रमख हे स्वत: बंजारा समाजातील असून, भाजपाचे उमेदवार केराम हे आदिवासी जमातीचे आहेत.किनवट मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत मग ती लोकसभा असो कि, विधानसभा आदिवासी विरुद्ध बंजारा अशा जातीय समीकरणावरच निवडणुक लढविल्या गेली असल्याचे भूतकाळातील निवडणुक निकालावरून लक्षात येते.या निवडणुकीत आ.केराम यांची आदिवासी जमातीची एकगठ्ठा मते विभागणी करण्यात यशस्वी होईल असा कोणताही विरोधातील मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.तर
बंजारा समाजातील मतांवर मोठी मदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक यांना यावेळी सचिन नाईक मित्रमंडळाचे व तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले बंजारा समाजातील अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांनी मोठे आव्हान उभे केले असून, दुहेरी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात तिरंगी होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तविण्यात येत असल्याने शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी महायुतीच्या भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपली तालुका शिवसेना प्रचाराला उतरणार नसल्याचे फर्मान काढल्याने ते कमळाचे कितपत नुकसान करतील व त्यांच्या या निर्णयामुळे बंजारा उमेदवार प्रदीप नाईक कि, सचिन नाईक यापैकी कोणाला याचा फायदा होतो हे सांगता येणे सध्या तरी शक्य नसले तरी यांचे दुरगामी राजकीय परीणाम नक्कीच भविष्यात दिसून येणार आहेत.
किनवट विधानसभेत माहूर तालुका महायुतीत उमेदवार/आमदार केराम यांच्या प्रचार नियोजन ते बैठक, निमंत्रण,सन्मानाची वागणूक ती आतामाहूर तालुका शिवसेनेला प्रचार नियोजनासह इतर कुठल्याही बाबतीत विश्वासात घेऊन प्रचारात सोबत घेण्यासाठी प्रयत्न केला गेला नसल्याचा आरोप सुदर्शन नाईक यांनी मित्रपक्ष भाजपवर केला आहे.त्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसेना पदाधिकारी हे प्रचारात उतरणार नसल्याचे नाईक यांनी सांगितले होते.
तालुका संघटक विनोद सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता शिवसेना पदाधिकारी दिसून येत नव्हते.
अशातच प्रचारात सामील असलेल्या सूर्यवंशी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांवर “शिवसेना शिंदे गट ताकदीनिशी आ.केराम यांच्या पाठीशी ” असा विश्वास व्यक्त केला होता. आपण तालुका प्रमुख असताना ता.संघटकांनी संपूर्ण माहूर तालुका शिवसेनेच्या वतीने अशाप्रकारे केलेले विधान ता.प्र.सुदर्शन नाईक यांना रुचले नव्हते, परिणामी,आता आ.केराम यांच्या प्रचारासाठी कोणीही उतरणार नसल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे ऐण निवडणूऊकीच्या तोंडावर महायुतीतील ही खदखद भाजपासाठी या निवडणुकीत धोक्याची घंटा व प्रचंड डोकेदुखी तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘वेक अप कॉल ‘ ठरणार आहे.