आज माहूर येथे महायुतीचे उमेदवार आ.केराम यांची जाहीर प्रचार सभा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

प्रचाराचा आज शेवटचा दिवस; दुपारी ०५ वाजेपर्यंत राजकीय पक्षांना करता येणार प्रचार

बजरंगसिंह हजारी/प्रतिनिधी माहूर 

माहूर : किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.भीमराव केराम यांची माहूर येथेजाहीर प्रचार सभा आज सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२:०० ते ०४:३० वाजेपर्यंतच्या कालावधीतनगर पंचायत मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी दुपारी ५ वाजेपर्यंत राजकीय पक्षांना प्रचार करता येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेत्यांची फळी प्रचाराच्या मैदानात उतरविली आहे.दरम्यान 

०८३ किनवट/माहूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (ए.शिं.) व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) या प्रमुख घटक पक्षासह इतर मित्रपक्ष असलेल्या महायुतीचे भाजपाचे उमेदवार/आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी ०७ नोव्हेंबर रोजी किनवट येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार संपन्न झाली.त्यानंतर आमदार केराम यांच्या प्रचारासाठी किनवट/माहूर मतदारसंघात विविध ठिकाणी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक जाधव यांच्या प्रचारासाठी नुकतीच खा.अमोल कोल्हे यांची किनवट येथे जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. प्रदीप नाईक हे देखील मतदारसंघात विविध ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करताना दिसून येत आहेत.

माहूर येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम हे जनतेला उद्देशून संबोधित करताना आज काय बोलतात याकडे मतदाररांसह विरोधी उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
error: Content is protected !!