नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : लोहगाव ते भोकर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावरील डांबराचा थर एकंदरीत पाहता नष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर कामात डांबराचा अल्प पुरवठा व थिकनेस मजबुती नसल्याने व dbm, आणि bc चा थर व्यवस्थित नसल्याने आणि रस्त्याचा लेव्हल नसल्याने रस्त्यावरील खड्डे पडण्याची दाट शक्यता. लोहगाव ते भोकर राज्य महामार्गाचे काम मागील एक वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असून सदर कामात मात्र मोठी सारवा सारव केल्याचे एकंदरीत दृश्य दिसून येत आहे या राज्य महामार्गासाठी शासनाने तब्बल कोट्यावधीचा निधी पुरवला असून देखील रस्त्याच्या कामात मात्र सारवा सारव झाले असल्याचे येथील नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. या राज्य महामार्गाचे काम कल्याण टोल प्रायव्हेट लिमिटेड (के. टी.) कंपनीने केले असून सदर रस्त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून राजेश वंगल यांनी भोकर ते लोहगाव राज्य महामार्गाची मोठी सारवा सारव केले आहे. या कामाची केवळ एक वर्षात गुंडाळपट्टी करून येथून पळ काढल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.
सदर रस्त्याच्या कामात नेमके कोणाच आशीर्वाद की कोणाचा मुख सहमतीने टक्केवारी यामुळे रस्त्याचे मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाले असून नागरिकात मात्र संभ्रम हा रस्ता दो पदरीकरण झाल्याने येथील नागरिक,व्यापारी,वाहन चालक,कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, यांच्यात संतोषचे वातावरण पसरले होते पण काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुन्हा रस्त्यावर खड्डे पडण्याची दाट शक्यता असल्याने व रस्त्यावर डांबर कमी वापरल्याने रस्त्याचे काम मात्र हलक्या दर्जाचे झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर राज्य महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे अनेक नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. के टी कंपनीने जागोजागी टोलनाके उभारून वाहनधारकांकडून पैसे उकळण्याचे काम करून कोठ्यावधी रुपये कमवतात मात्र रस्त्याच्या कामात मोठी सारवा सारव करून जनतेला वेठीस धरतात असे स्थानिक नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.
सदर रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याला भेगा देखील पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्याण टोलच्या अजब कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे परंतु याकडे संबंधित प्रशासन त्वरित लक्ष घालून संपूर्ण कामाची चौकशी करून व संबंधित के टी कंपनी आणि प्रोजेक्ट मॅनेजर त्यांच्यावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी आता जनतेकडून होताना दिसून येत आहे. अन्यथा पुन्हा लोहगाव ते भोकर राज्य महामार्गाचे काम मजबूत व टिकाऊ करून देण्यात यावी अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे.