सर्व जाती धर्मासाठी मी लढणारा कार्यकर्ता – सुशील कुमार देगलूरकर 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

देगलूर/ प्रतिनिधी,नागेश पलपवार

देगलूर – श्रध्देय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व धर्म समभाव असा संदेश देवून तोच आचरणात आणला. मी ही सर्व जातीसाठी लढणारा कार्यकर्ता असल्याने मला तुम्ही मतदानरूपी आशीर्वाद द्या असे आवाहन देगलूर – बिलोली मतदारसंघातील वंचितचे उमेदवार सुशीलकुमार देगलूरकर यांनी केले.

बिलोली येथील सभेत सुशीलकुमार देगलूरकर म्हणाले की, देगलूर व बिलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. देगलूर नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारणीसाठी मी नगरसेवक असताना प्रयत्न केले. ही अभ्यासिका सुरु झाली आहे.

      या अभ्यासिकेतून आजपर्यंत १३ अधिकारी झाल. कोणत्याही जाती – धर्मातील गरिबांची मुले असतील. त्यांनी अभ्यास करून ते मोठ्या पदावर जावेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. वंचित समाजासोबतच मला मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळत असून गफार यांनी स्वखर्चाने मला त्यांनी सभागृह व साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिले तर राहूल भालेराव, गफार व धम्मपाल कांबळे या तिघांनी माझ्या व तुमच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच मतदारसंघातील मी एकमेव असा उमेदवार असेल की, मला गोरगरीब जनतेने मतदानासोबत पैसे जमा करुन दिले आहेत. हे प्रेम फक्त मला मिळू शकले. माझ्या विरोधातील उमेदवार रेतीवाला तर मी मातीतला प्रामाणिक कार्यकर्ता आहे.

      तसेच काँग्रेस व भाजपचे उमेदवार हे बुजगावणे असून अपक्ष म्हणून लढणारा एक माजी आमदार फक्त नोटा छापण्यासाठी आमदार होऊ इच्छितो. त्यामुळे तुम्ही माझ्या सारख्या लढणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यास संधी देवून विधानसभेत तर लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर,अक्षय बनसोडे, बी.एम. कांबळे, चंद्रप्रकाश देगलूरकर, शंकर महाजन, संजय कांबळे, धम्मदीप गावंडे, अभिनंदन खानापूरकर, जयपाल कांबळे, गजानन चिंतले, मारोती ऐडकेवार, सुभाष प्रचंड, शिवराज सुर्यकर, मारोती कांबळे, गंगाधर कांबळे, पवन पाटील, अमोल शेरे, दयानंद वाघमारे, शिवाजी विचारे, गंगाधर ईबितकर, गौतम गावंडे, बादल जाधव सह अनेक जण उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!