अभिषेक बकेवाड|हिमायतनगर – ओबीसी समाज संघटना गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी चे निष्ठापूर्वक व ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात कार्य असून, हादगाव/हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज ज्या ठिकाणी आहे तिथे प्रत्यक्ष भेट देऊन, ओबीसी समाज बांधवाचे संघटन मजबूत करण्यासाठी सतत धडपडत कार्य हिमायतनगर ओबीसी ता. अध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांनी केले आहे.
ओबीसी समाजाला आजपर्यंत वेळोवेळी राज्यकर्त्यांनी आरक्षण संदर्भात आश्वासन देऊन त्यांची कोठलीच मागणी कोठल्याच पक्षाणे पुर्ण केली नसल्यामुळे नाराज असलेले ओबीसी समाज बांधव आज वेळ आली म्हणून विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज संघटना आपली भूमिका स्पष्ट करतील असे आव्हान हिमायतनगर तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड केले आहे.
महाराष्ट्रात अनेक मंत्री, खासदार, आमदार, ओबीसींच्या मतांवर झाले पन आमच्या ओबीसी समाजाचा फायदा कुठेच करून दिला नाही, वेळोवेळी समाजाला आश्वासन देऊन दिशाभूल केली जात आहे, यामुळे महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व समाज बांधवात असंतोष पसरला आहे.,
त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील OBC, SC, ST समाज बांधव यांचे मत निर्णायक ठरेल.असे मत आमच्या प्रती निधीसी बोलतांना व्यक्त केले आहे.