भोकर प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड
भोकर – बसंत बीजी 2, या कापूस वाणाला उत्कृष्ट कपाशी वाण म्हणून सन्मानित करण्यात आले तसेच या कापूस वाणाला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये सार्वजनिक दरात महोत्सव 2024 निमित्त आयोजित हिंगोली कृषी विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट पीक स्पर्धेमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या कपाशी वाण मधील कोहिनूर सीड्स फिल्डस इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या बसंत बिजी 2, या कपाशी वाणाला सन्माननीय आमदार श्री मा. राजू भैया नवघरे यांच्या उपस्थितीत प्रथम पारितोषिक देऊन उत्कृष्ट कपाशी वाण म्हणून सन्मानित करण्यात आले कोटा गावांमधील प्रगतशील शेतकरी श्रीमान दर्शन शंकरराव खराटे यांनी त्यांच्या शेतामध्ये कोहिनूर सीड्स फिल्डस इंडिया प्रा. ली. या कंपनीच्या बसंत बिजी 2, या या कपाशी वाणाची लागवड केली होती त्यांना यावर्षी या कापूस मधून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे त्याबद्दल हिंगोली जिल्हा कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या दसरा महोत्सव2024 मध्ये बसंत बीजी 2, कापूस वाण हे वजनदार व मोठे बोंड असलेले वेचणीस अगदी सोपा आहे तसेच फळ फांद्या जास्त असून रसशोष क किडीस सुद्धा कमी बळी पडते महागुण वाण लवकर येणारे रोग व किडीला कमी बळी पडणारे मोठे बोंड व वेचणीस अगदी सोपे असणारे हे वाण कोठा गावा मधील प्रगतशील शेतकरी श्रीमान दर्शन शंकरराव खराटे यावर्षी लागवड केले होते त्यांना यामधून भरपूर उत्पन्न होणार असल्यामुळे पुढील वर्षी पण हेच वाण लागवड बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपले उत्पन्न वाढवावे असा मोलाचा सल्ला प्रगतशील शेतकरी शंकरराव खराटे यांनी शेतकऱ्याला दिला शंकरराव खराटे यांना कंपनीचे रिजनल मॅनेजर श्री मा. नामदेव मुनगोड यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
सदरील वाणाला भोकर तालुक्यात सुद्धा खूप मागणी आहे आणि यावर्षी या वाणाची शेतामध्ये पीक जोमदार आहे.