निवडणुकीच्या आखाड्यात काँगेसच्या उमेदवाराला कोहळीकरानीं चारली धूळ
हिमायतनगर शहरासह अनेक गावात फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक
प्रतिनिधी /माधव काईतवाड
हिमायतनगर:-हदगाव हिमायतनगर विधानसभा – 84 मतदार संघात यंदा मतांची टक्केवारी वाढल्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील शी चर्चा सर्वत्र असताना कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवून निकालात संभ्रम निर्मण करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वच फेरीमध्ये बाबूराव कदम यांच्या मतांची आकडेवाडी वाढतच गेल्याने शेवटी बाबूराव कदम यांचा विक्रमी मतांनी म्हणजेच 31 हजार 40 मतांनी विजय झाला. बाबाजीराव कदम याना निवडून आणण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी घेलेली मेहनत फळाला आलू असल्याने ते विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर कोण../ निवडून येणार याबाबत चौका चौकात चर्चा सुरू होत्या. तर अनेक कार्यकर्त्यांनी शर्यती लावून जय पराजयावर भाष्य केले होते. दरम्यान दिनांक २३ रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी निकालाच्या अंतिम फेरीपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर फेक निगेटिव्ह पसरवून जनमानसात संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांना पुरून उरत शेवटच्या फेरीपर्यंत बाबुराव कदम कोहळीकर यांची लीड कटलीच नाही. त्यामुळे बाबुराव कदम यांचा 31 हजार 40 मताच्या फरकाने दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विजयाची माहिती मिळताचा हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात फटाक्याची अतिशबाजारी व जल्लोष साजरा करण्यात आला.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापासून फटाक्याची आतिशबाजारी करत गावातून जल्लोष मिरवणूक काढली. तात्पुरती 12 वाजता महाराष्ट्रात महायुती सरकारची आघाडी असल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत ठिकठिकाणी व्यापारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवीत जल्लोष साजरा केला तसेच येथील भाजप शिवसेना महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत आला बाबूराव…. आता आला बाबुराव…. या नावाचा एकच जयघोष सुरू होता.
मिरवणुकीत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि बाबुराव कदम कोहळीकर यांचे छायाचित्र हातात धरून युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरून विजयाचा आनंद उत्सव साजरा केला. तर अनेकांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढा भरवत जिलेबी खाऊ घालून आनंद साजरा करत विजय यांच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच मागील निवडणुकीमध्ये तीनदा पराभव पत्करल्यानंतरही हार मानता बाबुराव कदम कोहळीकर यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, महायुतीने सरकारने केलेल्या विविध विकास कामावर प्रभावित होऊन आणि काँग्रेसचे लाडक्या बहीण योजनेला केलेला विरोध लक्षात घेऊन भरपूर मतदान झाल्याने बाबुराव कदम कोहळीकर यांचा विजय झाला तर या विजयामध्ये हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे ठरले असल्याचेही एकच चर्चा सर्वत्र होत होती.
हिमायतनगर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील बाबुराव कोहळीकर यांच्या विजयामध्ये मोठा सहभाग घेतला असून, निवडणूक पूर्वी मुस्लिम समाज बांधवांनी बाबुराव कदम कोहळीकर यांना पाठिंबा देऊन डोअर टू डोअर प्रचार केल्यामुळे हिमायतनगर शहरातून मताची आघाडी मिळाली असल्याचेही बोलले जात आहे