माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी
माहूर – बंर झालं कमळाचा सुगंध दरवळला आणि तुतारीचा आवाज नाही घुमला.कारण, एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या महायुतीच्या कमळाच्या सुगंधापुढे, भेदक धनुष्यबाणासमोर आणि इंग्रजीतील V आकारात अचुक टायमिंग साधणारी घड्याळ अशा मोठ्या वरातींच्या जमावापुढे एकटा (इतरही काही निवडून आलेत) प्रदीप नाईक तुतारी वाजवून काय या तालुक्याचा विकास करणार होता.ही बोलकी प्रतिक्रिया आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक हे किनवट विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपाचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांच्या विरोधात सलग दुसऱ्यांदा आपटल्यानंतर तुतारी समर्थकांची.
जे आजकालच्या राजकारणात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वागतात त्यांच्यासाठी हे बोध घेण्यासारखे असून,यावरून एक स्पष्ट होते कि,किनवट विधानसभेत महायुतीचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा आता निश्चितच वाढलेल्या असून,या निवडणुकीत मते दिलेल्याच नव्हे तर विरोधात मतदान केलेल्या मतदार जनतेच्या मनात देखील केराम यांना आता या भागाचे भाग्यविधाते बनविण्यासाठी राज्याच्या नविन मंत्रिमंडळात एखादे विभागाचे मंत्रीपद देण्यात यावे अशी सुप्त नाही तर उघडच इच्छा आहे.
नांदेड जिल्ह्याच्या टोकावर व तेलंगणाच्या सिमेवर वसलेल्या आजपर्यंत मंत्रीपदापासून वंचित असलेल्या किंवा/माहूर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये निवडून आलेल्या महायुतीच्या भाजपाचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी २०१९ व २०२४ अशा सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदीप नाईक यांना दोनदा धुळ चारली.आणि जो उमेदवार सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान पटकावतो तो इतरांपेक्षा वेगळा व त्या मतदारसंघातील जनतेच्या मनातील ताईत बनलेला असतो.अशा लोकप्रिय आणि विकासपुरुष आमदाराला या भागाचा वर्षिनू्र्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केवळ आमदार निधीवरच अवलंबून न ठेवता मोठं काम करुन या आदिवासी बहुल मतदारसंघातील भाग्यविधाते बनविण्यासाठी राज्याच्या विधानसभेत एखादे विभागाचे मंत्रीपद देऊन गौरविण्यात आले तर हा त्यांचा खरा गौरव आणि या मागासलेल्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दिलेला खरा न्याय ठरणार आहे.भाजपकडून विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्यासाठी सिंहांचा वाटा उचलेले उपमुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.भीमराव केराम यांना आदिवासी विकास अथवा इतर एखाद्या विभागाचे मंत्रिपद देऊन किनवट मतदारसंघास न्याय द्यावा अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.
विकासापासून वंचित असल्याकारणाने साधारण तीन वर्षापूर्वी किनवट व माहूर तालुके शेजारच्या तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली होती ती नंतर आ.भीमराव केराम यांनी या मतदारसंघात जवळपास
२५०० कोटींचा विकास निधी खेचून आणत विविध विकास कामे केल्यानंतर हळूहळू शांत झाली.निवडणुक प्रचारात देखील आ. केराम यांनी किनवटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व नांदेड जिल्हा मुख्यालयात पासून तब्बल २००किलोमिटर दुर अंतरावर असलेल्या या किनवट तालुक्यातील जनतेचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी किनवटला जिल्हा घोषित करण्याची मागणी किनवट येथील एका प्रचार सभेत भाषण करताना उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.हे या ठिकाणी विशेष नमुद करण्यासारखे आहे.इस्लापूर व मांडवी तालुक्याची नवनिर्मिती,चिमटा धरण , रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी बंद पडलेला साखर कारखाना, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी नविन उद्योग, कारखाने आदींची उभारणी या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आता नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार भीमराव केराम यांना राज्यमंत्री मंडळात एखादे मंत्रीपद देण्याची हीच खरी वेळ असून,जर या भागावर कायम निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर भाजपाला यापेक्षा अधिक संधी पुन्हा उपलब्ध होणार नसल्याने या संधीचा लाभ केराम यांनी उचलने अतीशय गरजेचे आहे.संधीचे सोने करुन घेण्यासाठी जनतेने केराम यांना पुन्हा एकदा संधी दिली असून, भाजपा पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते व सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती जातीने लक्ष घालून उपलब्ध करून देण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.