आमदार ॲड. श्रीजयाताई चव्हाण यांचे हस्ते मराठवाडा युवक काँग्रेस समन्वयक सोशल मिडिया चे रविंद्र शेषराव दिपके भाजपात प्रवेश.
अभिषेक बकेवाड| नांदेड – गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे विभागीय सचिव, ओबीसी चलवळीचे नेते तथा खा. अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक भुमन्ना आक्केमवाड भोसीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नांदेड जिल्हा ओबीसी अध्यक्ष पी.पी. फांजेवाड आणि उपाध्यक्ष तुकाराम कैलवाड यांनी मुंबई येथे भोकर विधान सभेच्या नवनिर्वाचित आमदार ॲड. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
या सदिच्छा भेटी दरम्यान भुमन्ना आक्केमवाड यांचे नेतृत्वाखाली मराठवाडा युवक काँग्रेस समन्वयक सोशल मिडिया चे रविंद्र शेषराव दिपके यांनी काल 27 नोव्हेंबर रोजी मा .आ. श्रिजयाताई चव्हाण यांच्या हस्ते भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी ॲड. आ. श्रीजयाताई चव्हाण म्हणाल्या की, महाराष्ट्राचे प्रणेते तथा केंद्रीय गृह मंत्री स्व. शंकररावजी चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांचे सामाजिक संस्कार घेवून मी समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात उतरले व सर्वांनी मला घवघवीत यश देवून आपली सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.

हे श्रेय माझे वडील आदरणिय अशोकराव चव्हाण व त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते व जनतेचे आहे.,आपण असेच सर्वजण माझ्या पाठीशी खंबीर रहावे, अशी भावना ॲड. आ. श्रिजयाताई चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी ॲड. आ. श्रिजयाताई चव्हाण यांचे कार्यकर्ते व समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.