नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील गेल्या अनेक दिवसापासून दलित समाज लगत असलेले डीपी पूर्णतः बंद असल्याने दलित समाज व ओबीसी मराठा समाजामध्ये विजेचा अपुरवठा होत आहे. व अर्धा गाव अंधारामध्ये राहत असून या भागात वारंवार डीपी चे मोठे प्रॉब्लेम येत असून याकडे संबंधित प्रशासनाने मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर येत आहे.
हुस्सा येथील वारंवार विजेच लपंडाव हा जनतेला अंधारात ठेवण्यागत असल्याने हुस्सा येथील अर्ध्या गावांना मोठ्या समस्या व पाण्याचा प्रश्न देखील पुढे येत आहे. गावामध्ये लाईट व्यवस्थित येत नसल्याने पाणी देखील गावातील नागरिकांना मिळत नाही यामुळे गावातील नागरिकांची मोठी तारांबळ होताना दिसून येत आहे. एकंदरीतच महावितरणच्या बे जबाबदार कर्मचारी,अधिकारी यांच्यामुळे गाव अंधारात असून व गावातील बहुतांश प्रमाणात विजेचे लाईन हे व्यवस्थित नसल्याने गावामध्ये लाईट सुरळीत येत नाही. एकूण हुस्सा येथे चार डीपी असून त्यातील दोन डीपी चालू व दोन डीपी बंद असल्याने अर्धा गाव अंधारात राहत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
हुस्सा येथून हुस्सा परिसरामध्ये वीट भट्टी साठी विजेचा सप्लाय मोठ्या प्रमाणात होत असल्याने यामुळे गावामध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊन गाव अंधारात राहत आहे. आणि हा सप्लाय महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या संगणमताने व आर्थिक तडजोडी करून विजेचा सप्लाय करण्यात आल्याची चर्चा गावामध्ये होताना दिसून येत आहे. म्हणून संबंधित अभियंता व इंजिनिअर यांच्या विषयी गावांमध्ये संतप्त नागरिकाकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित हुस्सा येथील लक्ष वेधून गावामध्ये असलेले प्रॉब्लेम हे तात्काळ निकाली लावून विजेची लाईन हे सुरळीत करून देण्याची मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हुस्सा येथे विजेचा सप्लाय कासराळी येथून होत असून राहेर सबस्टेशन व तेथून नव्याने झालेली विजेची मेन लाईन हे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून त्यांच पोल हे अतिशय कमी प्रमाणात खोलीकरण व त्यावर निकृष्ट दर्जाची काँक्रीट करून सदर बोल बसविण्यात आले आहे मात्र ते पोल अतिशय निकृष्ट दर्जाचे बसविण्यात आले असल्याने भविष्य काळासाठी धोक्याची घंटा भरण्याची दाट शक्यता असल्याचे येथील नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. म्हणून संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हुस्सा व राहेर येथील नागरिकाकडून होताना दिसून येत आहे.
राहेर ते हुस्सा नव्याने झालेली विजेची लाईन हे नागपूर येथील कंट्रकदार असून त्यांनी या भागात अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून व कामाची सर्व सर्व करून या लाईनीमध्ये अनेक बाबी हे चुकीच्या पद्धतीने पोलची असलेली खोली हे अतिशय कमी दर्जाची असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोल झुकलेले आहेत अशा भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टदाराविरुद्ध संबंधित प्रशासनाने कामाची योग्य ती चौकशी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हुस्सा गावकरी चा सवाल.