व्यर्थ ना हो बलिदान, रक्तदान हेच जिवनदान
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – राज्याची राजधानी येथे समद्र मार्गे येऊन घातपात घात पात करण्यात आला होतो माय देश्याच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस यंत्रणा देशातील महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल वर आतंकवादी संघटनाने अति वरदाळीच्या वेळी हल्ला चंडीवला असता तो हल्ला परतून लावण्यासाठी सरसावले वीरपूत्र दोन हात
कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ दिल मायभूमिसाठी बलिदान दिल्या म्हणून त्यांच्या आठवणीत म्हणूनच आज आहे.रक्तदान शिबीर घेण्यात आले आहे.
मुंबईतला ताज २६.११.२००८ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांची सदैव सर्वांना आठवण राहण्यासाठी अनेक सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल भारतवर्षीय यादव महासभा महाराष्ट्र व अर्पण ब्लड बँक यांच्यावतीने “साथी बालाराम यादवनगर” वजीराबाद,नांदेड येथे शहीद झालेल्या वीर पुत्रांची आठवण करून देणारा उपक्रम रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदानाचे उद्दिष्ट देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबास व इतर गोरगरीब गरजू व्यक्तीसाठी याचा लाभ मिळावा.तसेच जीवनदान मिळावे अशा पद्धतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या उपक्रमात अखिल भारतवर्षीय यादव महासभा महाराष्ट्र व अर्पण ब्लड बँक चे सर्व कार्यकारी पदाधिकारी मेहनत घेऊन हा उपक्रम राबवण्यात मोलाचा वाटा देतात. या रक्तदान शिबिरात शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आपल्या देशासाठी समाजासाठी काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने रक्तदानात उस्फूर्त प्रतिसाद दिला, या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले,
त्या सर्व देशभक्तांना रक्तदान दिल्याचे प्रमाणपत्र व आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधानाची फोटो फ्रेम देऊन गौरविण्यात आले. हे रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने घेता येईल.यासाठी मोलाचा सहभाग व मेहनत घेतली.आपले कर्तव्य पार पाडणारे पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा या शहीद जवानांना आदरांजली वाहिली. या रक्तदान शिबिरात यादव युवक महासभा प्रदेश सचिव व सामाजिक कार्यकर्ते गोकुल बिशनकुमार यादव,अर्पण रक्त केंद्राचे संचालक सुदर्शन आदमनकर,कृष्णा भुसेवाड, संदीप लांडगे,श्रेयस कदम, विठ्ठल गोरे,शिवा काळे,व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.