जागतिक एड्स दिन निमित्त रॅली व साजरा

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

जिल्हा प्रतिनिधी/माधव काईतवाड 

नांदेड :- दि. 1 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिना निमित महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री गरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी 02 डिसेंबर ते 09 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात विविध कार्यक्रम प्रस्तावित केले आहेत यामध्ये सोशल मिडीया वरती एचआयव्ही/एड्सची माहीती व जनजागृती करणारे पोस्ट तयार करून व्हायरल करण्याकरिता पोस्ट तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन 02 डिसेंबर ते 09 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. याकरिता जिल्हास्तरावर प्रथम पारिताषिक 1500/- रू रोख, व्दितीय पारितोषिक 1000/-रू आणि तृतीय पारितोषिक 500/-रू रोख देण्यात येणार आहे. तालुका स्तरावर ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालय यांचे मार्फत विविध महाविद्यालयात प्रभातफेरी, रांगोळी स्पर्धा, पोस्टर तयार करणे स्पर्धा यांचे आयोजन या सप्ताहात करण्यात येणार आहेत. सेवाभावी संस्था यांच्या मदतीने अतिजोखीम गटाकरिता विशेष तपासणी शिबिर यासप्ताहमध्ये आयोजित केले जाणार आहे. एआरटी केंद्र विष्णुपुरी येथे 04 डिसेंबर 2024 रोजी एचआयव्हीसह जगणा-या मुलांकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता जिल्हास्तरावर प्रथम पारिताषिक 1500/- रू रोख, व्दितीय पारितोषिक 1000/-रू आणि तृतीय पारितोषिक 500/-रू रोख देण्यात येणार आहे.

मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. आयसीटीसी केंद्र व सुरक्षा क्लिनिक यांच्या सहकार्याने जिल्ह्यात 250 गावांमध्ये एचआयव्ही/एड्स बद्दल जनजागृती व आयईसी वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 15 रेडरिब्बन क्लब मार्फत एचआयव्ही/एड्स जनजागृती करिता पथनाट्य, फ्लॅश मॉब आयोजन करण्यात येणार आहे अशी माहीती डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी दिली.

यावेळी जिल्ह्यात एचआयव्ही बाधीत (पिएलएचआव्ही) 7013 अॅक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत यामध्ये पुरुष 3197, महिला 3310 एमएसएम/टीएस / टीजी 22, बालक 484 आदींचा समावेश आहे. सर्व बाधीत रुग्णांवरती एआरटी सेंटर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड यांच्यामार्फत नियमित उपचार केले जातात. याशिवाय बाधित रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र, मोफत बस प्रवास, आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड आदी देणे, घरकुल, संजयगांधी निराधार योजना, आदी सुविधांचा लाभ एनजिओ मार्फत देण्यात येतो. समाजामध्ये उपेक्षित समजल्या जाणा-या किन्नर, एफएसडब्लु आदी घटकांना देखील मुख्य प्रवाहात आणण्या करिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड व त्यांच्या अंर्तगत एनजीओ तर्फे विशेष प्रयत्न केले जातात.

दि. 02 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिना निमित मा. जिल्हाधिकारी, डॉ अभिजित राउत यांनी योग्य अधिकाराचा मार्ग स्विकारा माझे आरोग्य माझा अधिकार या घोषवाक्या‌द्वारे आपण एचआयव्ही/एड्स विरूध्द जनजागृती करून एड्सचा धोका टाळु शकतो असे आव्हान सर्व जनतेला केले आहे. मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याबाबत सर्व कर्मचा-यांना आदेशित केले आहे जेणेकरून जिल्ह्यातील गरोदर मातापासुन बाळाला होणारा एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल.

दि. 02 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिना निमित श्री गुरुगोविदसिंगजी स्मारक रूग्णालय नांदेड येथुन महाविरचौक-मुथाचौक-शिवाजी पुतळा यामार्गे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले, श्री गुरुगोविदसिंगजी स्मारक रूग्णालय नांदेड येथील प्रांगणात एचआयव्ही/एड्स रूग्णांसोबत समानतेची वागणुकी बाबत सर्वांनी शपथ ग्रहण केली तसेच उपस्थीतांना अल्पउपहार देवुन कार्यकमाची सांगता करण्यात आली यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राउत, मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम, विभाग प्रमुख सुक्ष्मजिवशास्त्र डॉ. संजय मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने मॅडम , वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी जाधव, जिल्हा कार्यकम अधिकारी डॉ. कुलदिप अंकुशे, विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, आयसिटीसीचे कर्मचारी, सुरक्षा क्लिनिक येथील कर्मचारी, विविध महाविद्यालयातील एनएसएस प्रमुख व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थीती होती.

Share This Article
error: Content is protected !!