तळ उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती खानापूर येथील नागरिकांची झाली..!

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

देगलूर तालुका प्रतिनिधी/नागेश पलपवार 

देगलूर:- तालुक्यातील खानापूर येथील तळ नावालाच..? खानापूर हा तळ्याचा गाव असून देखील येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते. खानापूर गावामध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई जाणवत आहे. तळ उशाला आणि कोरड घशाला अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय येथील गावातील महिलांना दरवर्षी येतो. पाण्यासाठी डोंगरदऱ्या कड्या- कपाऱ्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो. तसेच अनेक महिला तर दूरवरील हातपंपा पर्यंत जाऊन नंतर त्या हातपंपावर पाणी काढताना दिसून आल्या आहेत.

पाणीटंचाईने किती तळ गाठला आहे. हे भीषण वास्तव येथील गावातील लोकांनी समोर आणले आहे. उन्हाळा दूरच राहिला सध्या हिवाळा सुरू होताच इथल्या गावांमध्ये पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अनेक महीला दिसतात. हंडाभर पाण्यासाठी त्यांच जीवावर उधार होण अंगावर येत आहे. पाण्याने हातपंपाचा तळ गाठलाय तशा महिलाही जीव मुठीत धरून विहीरीच्या तळाला गेले आहेत. तांब्याने घोट-घोट पाणी हंड्यात भरून तो हंडा डोक्यावर घेण्याची ही कसरत डोळ्यात पाणी आणणारी आहे. आजची तहान भागवण्याची ही फरफट संपली तरी उद्याच काय हा प्रश्न आहे. पण गावात नळ कनक्शन असून देखील नळाला पाणी केव्हा येणार, हा प्रश्न कोण सोडवणार..?
ग्रामपंचायतचे डोळे केव्हा उघडणार..? खानापूर परिसरात हाकेच्या अंतरावर तळ आहे. महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातही दुर्दैवी म्हणजे सरकारच्या जलजीवन योजनेचा गाजावाजा असताना हे पाणीसंकट कोसळले आहे.

देगलूर तालुक्यातील ही माळरानावर राहणारी माणसे कीती दिवस या योजनेपासून वंचित राहणार..? याचा उत्तर कोणी देईल का..?
आजचा हा जीव मुठीत धरून चाललेला पाणीखेळ उद्या जीवावर बेतल्यावर सरकार यांच्याकडे पाहणार काय? जे दिसतय ते इतके भयान वास्तव असताना सरकार कशाची वाट पाहत आहे. उद्या यात काही दुर्दैवी घडू नये ही काळजी असेल तर सरकारने लवकर डोळे उघडावेत अशी मागणी करत आहेत. पाण्यासाठी पायपीट होऊ नये म्हणून गावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून पिण्याच पाण्याची टाकी बांधली. मात्र या पाण्याच्या टाकीला देखील गढूळ पाणी येत असल्याने, ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणण्यासाठी दुसऱ्या वार्डामधून पायपीट महिलांना करावी लागत आहे. निवडणुकीपुरते लोकप्रतिनिधी आश्वासन देतात, मात्र पुढील पाच वर्ष ते या गावांकडे फिरकत देखील नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी ग्रामिण भागात
नागरिकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नळ पाणी पुरवठा, साधी तळ्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, विंधन हातपंपाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अशा योजना राबविल्या जात आहे. या योजना आमच्या गावात राबवावा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नळाची मागणी होत आहे.

धरण उशाला आणि कोरड घशाला देगलूर तालुक्यातील खानापूर येथील तळ्यातील पाणी पुरवठा एकलारा, मनसखरगा, सुगाव, इब्राहिमपूर, अल्लापुर असे अनेक गावात होतं असते तर मंग खानापूर गावामध्ये का होऊ शकत नाही. खानापूर तळ्याचे असा नावलौकिक असलेल्या तळ्याचे पाणी गरज भासल्यास जवळच असलेल्या अनेक गावात पाण्याचा विसर्ग पुरवठा केला जातो. पण खानापूर गावात पंधरा दिवसाला एक वेळेस नळाला पाणी येत असते यावर ग्रामपंचायत चा अंकुश नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. तर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून मानधन मिळत नाही, त्यामुळे हे सर्व ग्रामपंचायत ऑपरेटर खानापूर गावासाठी पाणीपुरवठा वेळेवर करत नाहीत असे तेथील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे तेथील गावांतील दलित वस्तीतील नागरिकांना नाहक असा त्रास होत आहे. वस्तींवरच्या नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. म्हणूनच अशी परिस्थिती येथील खानापूर येथील नागरिकांची झाली आहे. याचं ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन वणवण भटकावे लागते ही शोकांतिका आहे. असे येथील ग्रामस्थ कडून बोलले जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेणार याकडे सर्व ग्रामस्थांकडून चर्चेला उधाण आला आहे.

Share This Article
error: Content is protected !!