जिल्यात पुन्हा छुप्या पद्धतीने खुलेआम अवैधधंदे चालू

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

बनावट दारू व ऑनलाईन गेम मुळे तरुणपिढी बरबाद

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यात कोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात चालू प्रत्येक शहरात बसस्टॅन्ड, रेल्वेस्टेशन,गर्दीच्या ठिकाणी, छुप्या पद्धतीने सुरू असलेला मटका बंद होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. “ओपन जेवू देईना; क्लोज झोपू देईना” अशी मटका शौकिनांची अवस्था झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत.

कोणाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मटक्याचा व्यवसाय थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी जिल्यातील जनतेतून होत आहे.

गेल्या काही महिन्या पासून बंद झालेला मटका पुन्हा छुप्या पद्धतीने सुरु होऊन मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटका बहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

 किरकोळ कारवाई करत असतात व पुन्हा जसे तसे दिवसांनी मटका पुन्हा चालू होतो,पण पोलीस कायमस्वरूपी मटका बंदची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

 पोलीस कारभार्यांच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे मटका व्यवसाय आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त करत आहेत.असे असतानांही कुठल्याही प्रकारचे अंकुश अवैध व्यवसायावर निर्बन्ध लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे.

जिल्यात शहाजी उमाप साहेब पोलीस महानिरीक्षक पदी रजू झाल्यामुळे काही महिन्यापूर्वी अवैध धंदे वाले जसे, अवैध दारू विक्री करणारे,गुटखा,मटका,क्लब,जुगार,असेच पेव फुटले होते पण जिल्यात शहाजी उमाप साहेबांच्या धाकाने मटका एजंट वरील सतत होणाऱ्या कारवाई मुळे मटका “ बंद” झाला होता,पण आता निवडणुका संपल्या निवडून येणारे आमदार हे आपल्या कार्यकरत्याना पुन्हा एकदा बंद झालेला मटका अवैधधंदे चालू करण्यासाठी मुख संमती दिल्यामुळे आता खुल्या व छुप्या पद्धतीने सुरू झालेला आहेत.

त्यामुळे आता नांदेडचे जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सुरू असणारे मटका, गुटखा,जुगार,क्लब,ऑनलाईन गेम,व्यवसाय व कायमस्वरूपी क्लोज करावेत व पोलिसांच्या खाबुगिरीला ही आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.

Share This Article
error: Content is protected !!