नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजप मित्रपक्षाने म्हणजेच महायुतीने मोठा विजय मिळवला. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कोण होणार? मंत्री कोण होणार? याबद्दल तर्कवितर्क चालू असतानाच मंत्रिपदांच्या संभाव्य यादीत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचे पहिल्या दहा जणांमध्ये नाव असल्याचे अतिशय विश्वसनीय वृत्त धडकले असून भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून भाजपाच्या अंत्योदयाच्या बिद्रवाक्यास अतिशय सार्थ ठरवणारे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वस्त असणारे आमदार राजेश पवार यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित असल्याचे समजते.
आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेडच्या भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार यांनी नायगाव मतदार संघातील नायगाव उमरी व धर्माबाद तालुक्यात आमदार कसा असावा,आमदाराचे कर्तव्य काय? मतदार संघाचा विकास कसा असावा? देव देश व धर्म याचबरोबर नागरिकांचे आरोग्य अबाधित कसे राहावे, मतदार संघातील सर्व जातीधर्माच्या लोकांना मूलभूत सुविधा कायमस्वरूपी कशा मिळवता येतील याबद्दल आमदार दांपत्याने जीवाचे रान करीत आमदाराची व्याख्या अधोरेखित केली.
नायगाव विधानसभा मतदारसंघात न भूतो न भविष्यती असा प्रचंड निधी खेचून आणून सर्व जाती धर्माचा त्यातून कसा विकास साधला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले.एवढेच नाही तर आमदार राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये विधानसभेच्या पावसाळी हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न अतिश अभ्यासपूर्ण मांडताना ते प्रश्न राज्यव्यापी झाले.त्यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेली पानंद रस्ते आद्ययावत करण्याची मोहीम ही आज राज्यव्यापी ठरुन निवडणुकीच्या काळात अजेंडाच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे पानंद रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आश्वासन आपल्या वचन नाम्यात दिले.याचे सर्व श्रेय आमदार राजेश पवार यांना जाते.त्यांच्या सरळ स्वभावाचा बरबटलेल्या यंत्रणेला एवढा त्रास झाला की ती सर्व एक होऊन आमदार राजेश पवार यांना नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत पराभूत करण्याचा कुठलाही प्रयत्न सोडला नाही.
काही माजी मंत्र्यांनी तर नायगाव मतदार संघातील आमदार राजेश पवार यांच्या विरोधात नाराज असलेल्याची सर्व सिस्टीम हायजॅक केली होती. एवढेच नाही तर काही प्रमुख प्रसार माध्यमही त्यांनी विकत घेतली होती.पण आमदार राजेश पवार यांनी जनतेच्या मनात दरम्यानच्या काळात एवढं प्रचंड घर व विश्वासाचे नाते निर्माण केले की उपरोक्त सर्वच गोष्टीवर मात करत मतदारांनी पुनश्च एकदा आमदार राजेश पवार यांना भरघोस मताने निवडून दिले. आणि विनाकारण आमदार राजेश पवार यांना विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ केला. त्यांनी आपल्या मतदार संघात केलेला विकास,पक्षासाठी केलेले त्यांचे कर्तव्य व कार्य पक्षाची सर्व ध्येयधोरणे मतदारसंघात शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणे आदी सर्वच गोष्टीची पक्षांकडे मोठी दखल झालेली आहे.
त्यामध्ये सत्यता आढळलेली नाही.उपरोक्त सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हे मंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे अगोदरच निश्चित होते. सद्यस्थितीत संभाव्य यादीमध्ये त्यांचे पहिल्या दहा मध्ये नाव असल्याचे विश्वसनीय वृत्त आमच्या कडे प्राप्त झालेले आहे.
याबाबत थेट मुंबईमध्ये असणाऱ्या आमदार राजेश पवार यांच्याशी दूरध्वनीवरून सुसंवाद साधला तेव्हा पक्षाने मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास मी ती पार पाडेनच पण मतदारसंघाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही.
मतदार संघातील तीनही तालुक्याचा पुढील पाच वर्षाच्या विकासाचा कृती आराखडा माझ्याकडे तयार असल्यामुळे मी निवडून जरी आलो तरी सूडबुद्धीचे राजकारण न करता विकास कामाकडे लक्ष देईन अशा सोज्वळ प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.