नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – अबिचलनगर कॉलोनी च्या जमिनीमध्ये गुरुद्वारा बोर्डाचे विविध प्रस्तावित प्रस्ताव असुन ही जमीन कोणत्याही शासकिय किंवा निमशासकिय प्रयोजनासाठी देण्यात येणार नाही.
आज दि. 30/11/2024 रोजी काही वर्तमानपत्रांमध्ये नांदेडच्या बसस्टँडसाठी अस्थाई स्वरुपात काही दिवसांसाठी गुरुद्वारा बोर्डाच्या मालकिची अबचलनगर कॉलनी बाफना रोड येथील जागा उपयोगात घेण्यात येणार बाबत बातमी प्रकाशित झालेली आहे. ज्यामुळे शिख समाजामध्ये खुप रोष निर्माण झाला आहे.
या संदर्भी बोर्डातर्फे खुलासा देण्यात येत आहे कि,बोर्डाकडे या जमिनी बाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. या जमिनीमध्ये गुरुद्वारा बोर्डाने पूर्वीच विविध प्रयोजनांसाठी ही जागा राखीव ठेवलेली आहे.
जरी शासकिय किंवा निमशासकिय वापरासाठी कोणतेही प्रस्ताव आल्यास आम्ही ही जमीन कोणालाही देण्यास बाध्य नसून या जागेवर फक्त गुरुद्वारा बोर्डाचे नविन प्रस्तावित प्रयोजनासाठी या जमिनीचा उपयोग करण्यात येणार आहे.अशी माहिती अधिक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड,नांदेड यांनी दिली आहे.