याचा आनंदोत्सव माहूर येथे फटाक्यांची आतषबाजी व पेढे भरवत जल्लोषात साजरा करण्यात आला.
माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी
,दि.०५ डिसेंबर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सर्वांचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आज मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली.
याचा आनंदोत्सवाचा जल्लोष माहूर येथील आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आज ०५ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस आप आगे बढो हम सब तुम्हारे साथ है, एक है तो सेफ है अशा नारेबाजीने माहूरगडाचा सबंध आसमंत दणाणून गेला होता.
यावेळी भाजपा ता.अ.कांतराव घोडेकर, विमुक्त जाती प्रदेश सचिव अनिल वाघमारे, ज्येष्ठ नेते विजय आमले,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवे, नंदकुमार जोशी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे,रहेमत अली, सरचिटणीस अपील बेलखोडे, पत्रकार वसंत कपाटे,पत्रकार बजरंगसिंह हजारी,
राजु दराडे ,शंकर भालेराव,फिरोज पठाण,दत्ता शेरेकर, नंदकुमार कोलपवार, विनायक मुसळे, संजय बनसोडे,अजय पवार,मनिष राठोड, दिगंबर जोशी,सदबा मुंडे शुभम ठाकुर, निळकंठ मस्के,संजय तिवसकर,विशाल खरे,किशोर आत्राम, निर्मलाताई जोशी, वंदनाताई मुंढे,सुजाताताई कांबळे यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.