महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  म्हणून  तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुंबई – महायुतीचा शपथविधी झाला; शेतकऱ्यांना पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळणार? महायुतीत दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या नाराजीनाट्याला ब्रेक लागून मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला. देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईच्या आझाद मैदानावर गुरुवारी (ता.५) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. पण कोणाकडे कोणतं खातं दिलं जाणार आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यां व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचे किती आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार ते अजून गुलदस्त्यात आहे.

११ किंवा १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शिवसेनेच्या नेत्याची वक्तव्य दिवसभर ऐकायला मिळाली. त्यात शपथविधीच्या आधीपर्यंत चाललेल्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानं उत्सुकता शिगेला पोहचली होती. शपथविधीपूर्वी दोन आठवडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तो डाव भाजपनं मोडून काढला. आणि पुन्हा एकदा फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!