देगलूर (प्रतिनिधी) :- नागेश पलपवार
देगलूर – तालुक्यातील काल दिनांक ५ डिसेंबर २०२४. रोजी खानापूर येथे आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल अनिल पाटील खानापूरकर देगलूर तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जल्लोषात आतिषबाजी करून व मिठाईवाटप करून
आनंद उत्सव साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित अनंत पाटील चेअरमन , विठ्ठलराव तरटे किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, देविदास वाघमारे अ. जा. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकांत बेलबुट्टे शक्ती केंद्र प्रमुख, बालाजी भायकट्टे बुथ प्रमुख, ज्ञानेश्वर ठिगळे, हावगीराव कामशेट्ये, बळी पटणे, विठ्ठलराव पाटील, शंकर देवाडे, राजू मुरगे, गुंडप्पा बक्कनवार, विठ्ठलराव यनलवार, काशिनाथ पिटलेवाड, संजय सुंके, मष्णाजी बक्कनवार, माधव लिंबुरे, व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.