गोल्ला गोलेवार यादव समाज शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शपथविधी सोहळा दरम्यान घेतल्या विविध मान्यवरांच्या भेटी.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

संपादक/अभिषेक  बकेवाड

मुंबई – नांदेड  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांचा शपथ विधी नुकताच संपन्न झाला.या वेळी गोल्ला गोलेवार यादव समाज शिष्ट मंडळाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आले आहे. 

     तसेच राज्यात महायुती भाजपचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड साहेब भोसीकर, गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा ओबीसी अध्यक्ष श्री प्रभाकरराव फांजेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष श्री तुकाराम कैलवाड, अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष श्री भीमराव दळे आबा, सोबत नारायण सोनी आणि आर.पी.आयचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!