दत्त जयंतीनिमित्त आनंद दत्त धाम आश्रमात सोहळा माहूर येथे.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

राष्ट्रसंत सद्‌गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक व भक्तगणांनी सहभागी होण्याचे आवाहन…

संपादक अभिषेक बकेवाड 

नांदेड – माहूर श्री. दत्त जयंती महोत्सवनिमित्त आनंद दत्त धाम आश्रम येथे राष्ट्रसंत सद्‌गुरू साईनाथ महाराज वसमतकरयांच्या मार्गदर्शनाखाली सातदिवस श्री. दत्त नामाच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आनंद दत्त आश्रम येथे ९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता भूपाळीने प्रारंभ होईल. ६ ते ९ दत नामस्मरण तर ९ते १० प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ५ पर्यंत पोथी चे वाचन व संध्याकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच १३ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला माहूर शहरात श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दत्त जन्मोत्सव दिनी म्हणजेच १४ रोजी

भक्तांसाठी रस-पुरण पोळीचा महाप्रसाद

 श्री. दत्त जयंती तथा गुरु महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होईल. त्यावेळेस ‘गुरुकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय’ तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दत्त जयंतीच्या दिनी ‘आमरस व पूरणपोळीचे जेवण’ प्रसाद स्वरूप दिवसभर आलेल्या सर्व भक्तांना देण्यात येणार आहे. १५ रोजी रक्तदान शिबीर व संध्याकाळी किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. आनंद दत्त धाम आश्रम व मठाधीपती राष्ट्रसंत सद्‌गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक व भक्तगणांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 

Share This Article
error: Content is protected !!