देगलूर प्रतिनिधी, नागेश पलपवार,
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची व गोपनियतेची शपथ घेतली.दरम्याण विधानभवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी सर्व महामानवास व मतदारसंघाच्या मातीस वंदन करुन शपथ ग्रहण केले.
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत विजय मिळवून आ. अंतापूरकर यांनी दुसर्यांदा विधानसभा गाठली आहे.
त्यांच्या शपथविधीनंतर समर्थकांनी उत्साहाने आनंद साजरा केला.दरम्याण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर शूभेच्छाचा वर्षाव केल्याचे पाहायास मिळाले.