यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे रुग्णाची कॅन्सरवर यशस्वी मात…!

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

दिगंबर लाठकर यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद चे डॉ.सोमा श्रीकांत व डॉ. भारत वासवानी यांचे मानले आभार…!!!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – येथील रुग्ण दिगंबर लाठकर यांना ऑगस्ट २०२३ दरम्यान मुख जिभेवर कर्करोगाचे निदान नांदेड येथील कान,नाक,घसा तज्ञ डॉ.सुभाष कोमावार यांच्याकडे झाले होते त्यानंतर डॉ.कोमावार यांनी सदरील रुग्णास पुढील उपचारांसाठी सिंकदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. भरत वासवानी यांच्याकडे संदर्भित केल्यानंतर मुख कर्करोगाची पुष्टी झाल्यानंतर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादचे सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ.सोमा श्रीकांत यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या शस्त्रक्रिया करत रुग्णाचा कर्करोग ग्रस्त भाग काढून टाकला तसेच त्या भागावर चे रेडिएशन पण पूर्ण झाले एकंदरीत सर्व सुविधा एकाच हॉस्पिटलमध्ये मिळाल्यामुळे दिगंबर लाठकर यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

  आज या संपूर्ण गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाले असून रुग्ण दिगंबर लाटकर हे अतिशय आरोग्यदायीरी्त्या आयुष्य जगत आहेत त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कार्यरत असलेले असिस्टंट मॅनेजर किरण बंडे यांनी दिगंबर लाठकर यांना केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे श्री लाठकर यांनी आभार मानले.

त्यांच्या या डॉक्टर कृतज्ञते बद्दल सर्व समाज बांधवाकडून कौतुक करण्यात येत आहे.सदर रुग्ण दिगंबर लाठकर यांचे हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण आली नाही व सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट.डॉ. सोमा श्रीकांत यांची नांदेड येथे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी व्हिजीट असते. तसेच मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ.भरत वासवानी यांची व्हिजीट ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असते.

रुग्णांच्या मदतीचे मनाला मोठे समाधान

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्य करण्याच्या हेतूने आरोग्यक्षेत्रात काम करतो आहे रुग्णांच्या अडचणीत आपण उपयोगाला येत असल्याने माझ्या मनाला एक वेगळे समाधान मिळते त्याबरोबरच एक बाब आर्वजून मांडावी वाटते ती म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हेल्थ इन्शुरन्स काढणे ही काळाची गरज असून आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये याची खूप मोठी मदत होते श्री.किरण अप्पाराव बंडे,असिस्टंट मॅनेजर,यशोदा हॉस्पिटल,सिंकदराबाद

 कॅन्सरवर मात केलेले रुग्ण श्री लाठकर यांना आनंदाश्रू

  पेशाने सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या व संपूर्ण हयातभर ही संघर्षमय वाटचाल असलेल्या श्री लाठकर यांना सेवानिवृत्तीनंतर आपण आयुष्याचा आनंद घेऊ असे स्वप्न रंगवीत असतांनाच त्यांना जिभेच्या कँन्सरने अचानकपणे वेढले तेही त्यांना जेवणाची चव लागत नव्हती व जिभेची आग होत होती.

    त्यामुळे तपासणीअंती कॅन्सरचे निदान झाले परंतु ईतक्या मोठ्या आजाराला आपण यशोदा हॉस्पिटल व डॉ.सोमा श्रीकांत आणि किरण बंडे यांच्या आधारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली व हे सांगतांना त्यांना गहीवरून आले.

यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादसाठी येथे करा संपर्क

यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भात विविध सुविंधाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास सोबतच्या क्रमांकाची संपर्क साधावा. 9154167997 / 91549 95463 असे आवाहन यशोदा हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!